शस्त्रक्रिया करुन थकलोय आता झोपतो असं सांगितलं, तासाभरानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केबिनमध्ये पाहिले तर…

शस्त्रक्रिया करुन थकल्याने थोडा वेळ झोपतो सांगून डॉक्टर केबिनमध्ये गेला. पण काही वेळाने कर्मचारी पहायले गेले तर त्यांना धक्काच बसला.

शस्त्रक्रिया करुन थकलोय आता झोपतो असं सांगितलं, तासाभरानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केबिनमध्ये पाहिले तर...
रुग्णालयातच डॉक्टरचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 11:17 AM

चंद्रपूर : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञाचा रुग्णालयातच मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमेश अग्रवाल असे मयत डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम आहे. अग्रवाल यांचा मृत्यू काही कारणातून की त्यांनी आत्महत्या केली याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

कर्मचाऱ्यांना म्हणाले मी थकलोय, उठवू नका

उमेश अग्रवाल हे सुप्रिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे चंद्रपूर शहरात स्वतःच्या मालकीचे साई आय हॉस्पिटल आहे. अग्रवाल यांच्या पत्नी देखील ख्यातनाम डेंटिस्ट आहेत. मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर अग्रवाल यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मी खूप थकलोय असे सांगितले. तसेच मला उठवू नका, असेही बजावले.

तासाभरानंतर कर्मचाऱ्यांनी पाहिले अन् धक्काच बसला

मात्र तासभर होऊन गेला तरी डॉक्टरांच्या केबिनमध्ये काहीच हालचाली जाणवत नव्हत्या. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केबिनचा दरवाजा उघडून पाहिलं तर कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. केबिनमध्ये डॉक्टर मृतावस्थेत पडले होते. डॉक्टरांनी आत्महत्या केली की नैसर्गिक मृत्यू झाला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.