रात्री जेवून आपल्या रुममध्ये झोपायला गेला, सकाळी उठला तर घरातील दृश्य पाहून धक्काच बसला; काय घडले नेमके?
बचावलेल्या 14 वर्षाच्या मुलाने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पिलीभीत : एकाच कुटुंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे उघडकीस आली आहे. वडिलांसह 11 वर्षाचा मुलगा आणि 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बचावलेल्या 14 वर्षाच्या मुलाने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
वडिल आणि दोन मुलं एका खोलीत झोपले होते
सदर कुटुंबातील बचावलेल्या मुलाच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सर्वजण जेवून झोपायला गेले. वडिल आणि दोन भावंडं एका रुममध्ये झोपले आणि तो दुसऱ्या रुममध्ये झोपायला गेला.
सकाळी उठल्यानंतर घरातील दृश्य पाहून मुलाला धक्काच बसला
सकाळी उठल्यानंतर घरात जे पाहिले त्याने मुलाला धक्काच बसला. दोन भावंडांचे मृतदेह पलंगावर पडले होते. तर वडिल दुसऱ्या रुममध्ये वडिल बालकराम गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.
मुलाने तात्काळ काकाला घटनेची माहिती दिली
मुलाने तात्काळ या घटनेची माहिती आपल्या काकाला दिली. त्यानंतर बाकी कुटुंबीय घटनास्थळी धावत आले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
अंधश्रद्धेतून घटना घडल्याचा संशय
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मुलाने सांगितले की, वडिल आणि बहिणीला बाधा झाली होती. गेल्या एक वर्षापासून कुटुंब एका तांत्रिकच्या संपर्कात होते. यावरुन अंधश्रद्धेतून या हत्या आणि आत्महत्या झाल्या असाव्या, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, पोलीस सदर तांत्रिकाचा शोध घेत आहेत.