सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 12:14 AM

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. मृत महिलेच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केलाय. दुसरीकडे पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातच त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण समजू शकणार आहे.

संबंधित महिला पोलीस कर्मचारी सोलापूरच्या ग्रामीण भागातील हगलूर गावातील बस स्थानकावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यानंतर त्यांना सोलापुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे.

आत्महत्येने पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण

संबंधित महिला पोलीस कर्मचारी या सोलापूरमधील एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्या गेल्या 4 वर्षांपासून या पोलीस स्टेशनमध्ये रुजू होत्या. त्यांना एक मुलगा आणि पती असा परिवार आहे. पती खासगी कंपनीमध्ये नोकरीस आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी सोलापूर सिव्हिल रुग्णालयमध्ये एकच गर्दी केली होती. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

मृत महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत प्रेम संबंध असल्याचं सांगत त्या तणावातून आत्महत्या केल्याचा दावा केलाय. ते म्हणाले, “एका पोलीस उपनिरिक्षकाने माझ्या पत्नीसोबत गोड बोलून प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्याबाबत आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही दोघांनाही समज दिली. मात्र, हा प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्याकडून थांबला नाही. त्यामुळे माझी पत्नी त्यात अडकत गेली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याकडून तिला खूप त्रास होत होता. त्यातूनच पत्नीने हे पाऊल उचललं.”

हेही वाचा :

Video: आधी त्यानं फुकटात पेट्रोल भरलं, कानशिलातही लगावली, नंतर पोलीस ठाण्यात शिवाीगाळ, बीडात सेना कार्यकर्त्याची गुंडगिरी

एटीएसने मनसुख यांच्या वकिलाचा जबाब नोंदवला, के. एच, गिरींकडून वाझेंबाबत मोठे गौप्यस्फोट

बलात्काराच्या आरोपीला 20 वर्ष कारावास, पोलिसांनी नराधमाला कोर्टातून दारु पार्टीला नेलं

व्हिडीओ पाहा :

Suspicious death of women police constable in Solapur

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.