लाचखोर तहसीलदाराकडे मोठं घबाड असल्याचा पोलिसांना संशय
नाशिकमध्ये मागच्या दोन दिवसांपूर्वी एका तहसिलदाराला एनसीबीच्या पथकाने लाच घेताना ताब्यात घेतलं. त्या तहसिलदाराची चौकशी सुरु असून त्यांच्याकडे १५ लाख रुपयांचा भूखंड सापडला आहे.
नाशिक : तहसिलदार (nashik talsildar news) घराच्या बाजूला १५ लाख रुपयांची लाच घेताना एनसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडला. त्यावेळी एनसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. तहसिलदारांच्या घरी चौकशी केली असता. त्यांच्याकडे ४ लाख ८० हजारांची रोकड आणि ४० तोळे सोने आढळले. एनसीबी त्या तहसिलदारी कसून चौकशी करीत असून त्यांच्याकडे लाखो रुपयांचा भूखंड असल्याची माहिती एनसीबीच्या (NCB) अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्या तहसिलदाराचं नाव नरेशकुमार बहिरम असं आहे. जेव्हापासून तहसिलदारांना (Tahsildar nareshkumar bahiram) एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून चौकशी सुरु आहे. भूखंड सापडल्याने अजून संपत्ती असल्याचा संशय एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आहे.
नाशिकचे लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या मालमत्तेची एसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. लाचखोर तहसिलदारांकडे आणखी १५ लाखांच्या मालमत्ता असल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. सध्याच्या चौकशीत धुळे जिल्ह्यात एक भूखंड असल्याचं उजेडात आलं आहे.
तहसिलदार बहिरम यांच्या बँक खाती आणि लॉकर्सचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरु केला आहे. सध्या सुरु असलेल्या चौकशीत सुध्दा मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांची दोन दिवसांची एनसीबीची कोठ़़डी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोठडीची मागणी केल्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
तहसिलदारांवरती कारवाई सुरु झाल्यापासून अनेक प्रकरणात ते अडकण्याची शक्यता असल्याची लोकांची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर लाचखोर तहसिलदाराला अटक केल्यानंतर लोकांना अधिक आनंद झाला आहे.