अखेर तलाठ्याला लाच घेणं भोवलंच, तक्रारदराने युक्ती लढवली आणि तलाठी एसीबीच्या ताब्यात, काय घडलं ?

| Updated on: Mar 08, 2023 | 7:45 AM

नाशिक विभागात लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. एसीबीच्या पथकाने नुकतीच एका मोठ्या गावातील तलाठ्याला लाच घेतांना रंगेहात अटक केली आहे.

अखेर तलाठ्याला लाच घेणं भोवलंच, तक्रारदराने युक्ती लढवली आणि तलाठी एसीबीच्या ताब्यात, काय घडलं ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये लाचखोरीच्या घटना ( Nashik News ) काही केल्या कमी होत नाहीये, नाशिकच्या ग्रामीण भागातही लाच ( Bribe ) घेण्याच्या वाढत आहे. यामधील विशेष बाब म्हणजे नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या ( ACB ) वतीने करण्यात आलेल्या कारवाईवरुन या घटना समोर आल्या आहे. त्यामध्ये सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी वारंवार लाचेची मागणी करणाऱ्या एका तक्रारदाराने तलाठ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामध्ये पाच हजार रुपयांची लाच घेतांना चांदोरी गावचा तलाठी महेश सहदेव गायकवाड याला रंगेहात पकडले आहे. या एसीबीच्या कारवाईने नाशिक ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. मात्र, महसूल विभागात असलेले लाचखोर अधिकारी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

खरंतर तक्रार यांच्या आत्याने आपल्या भावसह तक्रारदार भाच्याच्या नावावर जमीन करून दिली होती. याबाबत आत्याने मृत्यूपत्र लिहून दिले होते. त्यानुसार सातबाऱ्यावर नाव लावायचे होते. त्यानुसार तक्रारदाराने अर्जही दिला होता. त्यावेळी तलाठ्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.

विशेष म्हणजे याबाबतचे सर्व कागदपत्रे पूर्ण असतांना निफाडच्या दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात दस्तनोंद केलेले असतांनाही तलाठ्याने लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला आणि संपूर्ण प्रकार सांगितला.

हे सुद्धा वाचा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी संपूर्ण पडताळणी करून सापळा रचला. त्यावरून तलाठी महेश गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. त्यावरून महेश गायकवाड याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेत निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावाच्या तलाठ्याला लाच घेतांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महेश गायकवाड याच्याकडे चितेगावचा अतिरिक्त कारभारही होता. मौजे नागपूर येथील क्षेत्राचे हे संपूर्ण प्रकरण होते.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली कारवाई पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांचा समावेश होता. याशिवाय स्थानिक पंचांच्या माध्यमातून ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांची नियुक्ती झाल्यानंतर लाचखोरीच्या कारवाया वाढल्या आहे. मात्र, दुसरीकडे कारवाई केली जात असतांनाही लाच घेण्याचे प्रमाण कमी होत ही आश्चर्याची बाब आहे.