शॉकिंग! बिर्याणी मागितली म्हणून बायकोला पेटवलं, होरपळताना बायकोची पतीला मिठी

बिर्याणी मागणाऱ्या बायकोवर भडकला पती, वाद वाढला आणि अखेर आग पेटली!

शॉकिंग! बिर्याणी मागितली म्हणून बायकोला पेटवलं, होरपळताना बायकोची पतीला मिठी
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 1:03 PM

तामिळनाडूची (Tami Nadu Crime News) राजधानी चेन्नईमध्ये (Chennai) बिर्याणीवरुन (Biryani) एका दाम्पत्यात वाद झाला. वाद इतका वाढला की दाम्पत्य भांडणात ठार झालं. पत्नी पत्नीमध्ये झालेल्या वादातून घडलेली ही धक्कादायक घटना कळल्यानंतर सगळेच हादरुन गेलेत. चेन्नईच्या अयनावरम परिसरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली. बायकोनं आपल्या नवऱ्याकडे बिर्याणी मागितली होती. याचा राग येऊन नवरा बायकोत भांडणाला सुरुवात झाली असल्याचंही समोर आलंय.

समोर आलेल्या माहितीनुसार, नवऱ्याला बायकोनं बिर्याणी मागितल्याचा प्रचंड राग आला. या रागातून शब्दाला शब्द वाढत गेला. वाद इतक्या टोकाला गेली की संतापलेल्या पतीने थेट केरोसिन आपल्या बायकोच्या अंगावर ओतरलं आणि तिलं जिवंत पेटवून दिलं.

यात आगीत होरपळत असणाऱ्या पत्नीने नंतर पतीलाही मिठीत घेतलं आणि तोही आगीत होरपळला. या धक्कादायक घटनेत नवरा बायकोचा होरपळून दुर्दैवी अंत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

बिर्याणीच्या वादातून पत्नीला पेटवून देणाऱ्या पतीचं नाव करुणाकरण असल्याचं कळतंय. ते निवृत्त रेल्वे कर्मचारी होते. त्यांनी 70 वर्षीय पद्मावती यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीला पेटवून दिल्यानंतर तिनेही आपल्या पत्नीला आगीच्या कवेत घेतलं.

करुणाकरण आणि पद्मावती अयनावरम येथील टागोर नगरमध्ये एका घरात राहत होते. त्यांना चार मुलं आहे. चौघांचीही लग्न झालेली आहेत. त्यांची चारही मुलं वेगवेगळ्या शहरात राहतात. 7 नोव्हेंबर रोजी जेव्हा या दाम्पत्यामध्ये वाद झाला, तेव्हा घरात फक्त नवरा बायकोच होते.

आगीत होरपळल्यामुळे पती करुणाकरण यांचा 7 नोव्हेंबर रोजीच मृत्यू झाला. तर गंभीररीत्या जखमी अवस्थेत असलेल्या पत्नीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होतं. पण त्यांचीही मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. करुणाकरण हे 50 टक्के भाजले होते, तर त्यांची पत्नी 65 टक्के भाजली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये सातत्यानं भांडण व्हायची. सांभाळ करणारं कुणीच नसल्यामुळे हे दाम्पत्य उदास झालं होतं. त्यांच्या अनेकदा छोट्या-मोठ्या कारणावरुन शाब्दिक चकमक उडायची. पण 7 नोव्हेंबरला घरातून जोरजोरात आरडाओरडा ऐकू येऊ लागल्यानं शेजारी जमले आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.