चेन्नई – काहीवेळा छोट्या-छोट्या भांडणांच मोठ्या वादात रुपांतर होतं. कधी कधी वाद इतका विकोपाला जातो की, त्यातून एखाद्या व्यक्तीला आपल्या प्राणांना मुकाव लागतं. तामिळनाडूमध्ये अशाच प्राण्यावरुन झालेल्या वादात एका व्यक्तीची हत्या झाली. शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला कुत्रा म्हटलं म्हणून ही हत्या झाली. यात एका 65 वर्षीय शेतकऱ्याची हत्या झाली. तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील थाडीकोंबू शहरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने आसपासच्या सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
भांडणाची सुरुवात कशावरुन झाली?
रायाप्प्पन शेजाऱ्यांनी घरात पाळलेल्या कुत्र्यावर नाराज होता. त्याने अनेकदा शेजाऱ्यांकडे त्या कुत्र्याची तक्रारही केली होती. शेजारी रहाणारे डॅनियल आणि विनसेंट हे रायाप्पनचे नातेवाईक होते. घराजवळून जाणाऱ्या वाटसरुंवर कुत्रा भुंकायचा. त्यांच्या अंगावर धावून जायचा. त्यावरुन रायाप्पनच्या मनात राग होता. रायाप्प्नने त्या कुत्र्यांना त्यांच्या नावावरुन बोलवलं नाही. त्यांना कुत्रा म्हटलं. त्यावरुन भांडणाची सुरुवात झाली. या कुत्र्याला मालकाने चैन बांधून ठेवाव, असं त्याच म्हणणं होतं.
मारण्यासाठी काठी घेऊन आला
गुरुवारी वाद नियंत्रणाबाहेर गेला. भांडण सुरु असताना रायाप्पन त्या कुत्र्याला मारण्यासाठी काठी घेऊन आला. संतापलेल्या विनसेंट आणि डॅनियलने हल्ला चढवला. रायाप्पन खाली पडला, तो बेशुद्ध झाला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. थाडीकोंबू पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींच्या शोधासाठी लूकआऊट नोटीस जारी केलीय.