तासभर कुठल्या मुलीशी बोलतोयस? बायकोने रागात मोबाईल फोडला, नवऱ्याची आत्महत्या

सहा महिन्यांनी दोघांची भेट झाली, मात्र बायकोशी गप्पा मारायचं सोडून कृष्णा आपल्या मोबाईलवर मेसेज करण्यात गुंग होता. पूजा रात्रीचे जेवण बनवायला गेली, तेव्हाही कृष्णा कोणाशी तरी फोनवर बोलत होता.

तासभर कुठल्या मुलीशी बोलतोयस? बायकोने रागात मोबाईल फोडला, नवऱ्याची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 8:30 AM

चेन्नई : परक्या महिलेसोबत बोलल्याच्या रागातून बायकोने नवऱ्याचा मोबाईल (Mobile) फोडला, तसंच तिच्यासोबत बोलण्यासही मनाई केली. त्यामुळे व्यथित झालेल्या नवऱ्याने आत्महत्या (Suicide) केली. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये (Chennai) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कृष्णा (वय 22 वर्ष) असं मयत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तामिळनाडूतील सुंगुवरछत्रम येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. एक वर्षापूर्वी कृष्णाचा विवाह त्याच्याच गावात राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीशी झाला होता. सासरी परतल्यानंतरही नवरा नीट बोलत नसल्याने दोघांमध्ये भांडण झालं होतं.

काय आहे प्रकरण?

पूजा गावी गेली होती, मात्र जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी ती सुंगुवरछत्रमला परतली. सहा महिन्यांनी दोघांची भेट झाली, मात्र बायकोशी गप्पा मारायचं सोडून कृष्णा आपल्या मोबाईलवर मेसेज करण्यात गुंग होता. पूजा रात्रीचे जेवण बनवायला गेली, तेव्हाही कृष्णा कोणाशी तरी फोनवर बोलत होता. काम आटोपल्यानंतर पूजा त्याच्याशी बोलायला आली, तरी तासभर तो एका महिलेशी फोनवर बोलत होता. पूजाने महिलेबद्दल विचारणा केली तेव्हा कृष्णाने ती आपली सहकारी असल्याचे तिला सांगितले.

परस्त्रीसोबत अफेअरचा आरोप

चिडलेल्या पूजाने तुझे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत का, असा जाब विचारला. दोघांमध्ये यावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तिने त्याचा फोन हिसकावला आणि फोडला, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

वादावादीनंतर पूजाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले, तर कृष्णाने व्हरांड्यात छताला गळफास लावून घेतला. अर्ध्या तासानंतर पूजाने दरवाजा उघडला तेव्हा तिला कृष्णा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंत शेजाऱ्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली.

संबंधित बातम्या :

अपघात झाल्याचा खोटा बहाणा, मित्राच्या घरी पोलिसाची आत्महत्या

पत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

आंब्याच्या झाडावर आयुष्याची अखेर, तलाठ्याची शेतात आत्महत्या, सकाळी पत्नीसमोर भयावह दृश्य

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.