टाटा कंपनी शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री देणार; हा मेसेज तुम्हालाही आलाय का?

हा मेसेज इंग्रजी भाषेत असून तुमची 50 भाग्यवान लोकांमध्ये निवड झाल्याचे प्रलोभन त्यामध्ये दाखवण्यात आले आहे. | xiaomi MI 11 T

टाटा कंपनी शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री देणार; हा मेसेज तुम्हालाही आलाय का?
अचूक उत्तरे द्या, शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री मिळवा. या मेसेजला भुलू नका.
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 11:42 PM

मुंबई: सध्या सोशल मीडियावर टाटा कंपनीच्या नावाने एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये टाटा कंपनीच्या सर्वेक्षणात सहभागी झाल्यास शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन मोफत दिला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा मेसेज खोटा असून त्यापासून सावध राहण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. (Tata compnay fake survey message about free smartphone xiaomi MI 11 T )

हा मेसेज इंग्रजी भाषेत असून तुमची 50 भाग्यवान लोकांमध्ये निवड झाल्याचे प्रलोभन त्यामध्ये दाखवण्यात आले आहे. या मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असे पोलीस आणि टाटा कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नेमका काय आहे हा मेसेज?

आमच्या सर्वेक्षणासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. केवळ एक मिनिटाचा वेळ लागेल. आणि तुम्हाला एक जबरदस्त भेट वस्तू शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री मिळेल. बुधवारी आम्ही 50 जणांची निवड केली आहे. या सर्वांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. यात 50 लकी विजेते ठरणार आहेत. हे सर्वेक्षण आमची गुणवत्ता तपासण्यासाठी केला जात आहे. तसेच यात 100 टक्के बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हाला केवळ 4 मिनिट 24 सेकंदात या सर्वेतील प्रश्नाची उत्तर द्यायची असून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्वरा करा, बक्षिसांची संख्या ही मर्यादीत आहेत, असा

‘व्हॅलेंटाईन डे ऑफर’च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

व्हॅलेंटाइन डे निमित्त ताज हॉटेलकडून तुम्हाला खास बक्षीस देण्यात येणार असून ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आल्याचा फेक मेसेजही नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ताज हॉटेलची कुपन्स व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या कुपन्सचा वापर करून तुम्ही ताज हॉटेलमध्ये 7 दिवस मोफत राहू शकता. तुमच्याकडे 3 संधी आहेत. गुड लक.’, असा मेसेज येतो.

या वेबसाईटवर गिफ्ट कार्ड क्लेम करण्यासाठी ओके क्लिक केल्यावर दुसरे पेज ओपन होते. इथे काही प्रश्न विचारले जातात. ज्याची उत्तरे दिल्यानंतर आणखी एक पेज उघडले जाते. जिथे टाटाच्या लोगोचे 12 बॉक्स दिसतात. यावर क्लिक केल्यावर तुम्ही गिफ्टकार्ड जिंकलात की नाही हे कळते. त्याचबरोबर हा मेसेज इतर 5 ग्रुप आणि 20 लोकांना पाठवण्याच्या टास्क दिला जातो.

संबंधित बातम्या:

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.