Sangli Tempo : सांगलीत वारकऱ्यांना घेवून जाणारा टाटा टेम्पो उलटला, अपघातात 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी

पंढरपूरहून आषाढी एकादशी यात्रा संपवून वारीतील सुमारे 33 भाविकांना घेवून टाटा टेम्पो हा बत्तीस शिराळा येथे चालला होता. परंतु पवार वस्तीजवळील वळणार चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा टेम्पो पलटी झाला.

Sangli Tempo : सांगलीत वारकऱ्यांना घेवून जाणारा टाटा टेम्पो उलटला, अपघातात 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी
सांगलीत वारकऱ्यांना घेवून जाणारा टाटा टेम्पो उलटलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 6:09 PM

सांगली : सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर वारकऱ्यांना घेवून जाणारा टाटा टेम्पो (Tata Tempo) उलटल्याची घटना घडली आहे. आज दुपारी झालेल्या अपघाता (Accident)मध्ये 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वजण शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर टेम्पो पलटी झाला. यात काही भाविक जखमी झाले असले तरी सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.

वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

पंढरपूरहून आषाढी एकादशी यात्रा संपवून वारीतील सुमारे 33 भाविकांना घेवून टाटा टेम्पो हा बत्तीस शिराळा येथे चालला होता. परंतु पवार वस्तीजवळील वळणार चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा टेम्पो पलटी झाला. यामध्ये टेम्पोमधील महिला आणि पुरुष वारकरी एकमेकांच्या अंगावर पडले. काही टेम्पो बाहेर फेकले गेले. यामध्ये सुमारे 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने तासगाव, मिरज, सांगली येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

नवी मुंबईत पाम बीच मार्गावर कारचा भीषण अपघात

बेलापूरवरून वाशीच्या दिशेने जात असताना नियंत्रण सुटल्याने नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर कारचा भीषण आपघात झाल्याची घटना घडली आहे. कार जोरदार डीव्हायडरवर आदळली. यामध्ये कार चालक गंभीर जखमी असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कारचेही मोठे नुकसान झाले आहे. जिग्नेश गुप्ता असे जखमी कार चालकाचे नाव आहे. पाम बीच मार्गावर करावेच्या मार्गावर अतिवेगात असलेल्या कारचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. होंडा सिटी कंपनीची गाडी होती. (Tata Tempo overturns in Sangli, 8 to 10 Warkaris seriously injured in accident)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.