दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा गेला जीव, शुल्लक वादावरून टॅक्सी चालकाचे तरूणावर चाकूने वार
Delhi Crime News : सराय काले खान परिसरात किरकोळ वादानंतर टॅक्सी चालकाने एका तरुणावर कोयत्याने वार करून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गुन्हेगारांची भीड जास्तच चेपली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी कारवाया (crime) पाहून त्यांच्या मनात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना प्रकरण सराय काले खान परिसरात घडली आहे. याठिकाणी किरकोळ वादानंतर एका टॅक्सी चालकाने (taxi driver stabbed young man) तरुणाची चाकूने वार करून हत्या (death)केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आकाश हा त्याच्या कुटुंबासह सराई काळे खान परिसरात राहत होता. आकाश बेलदारीचे काम करायचा. तो त्याच्या 8 भावंडांमध्ये सातव्या क्रमांकावर होता.
गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आकाश हा त्याच्या मित्रांसह घराबाहेर पडला होता. चालताना आकाशच्या एका मित्राचा हात एका टॅक्सी चालकाला लागला. अशा किरकोळ गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान आकाश त्या दोघांचे भांडण थांबवण्यासाठी पोहोचला असता संतप्त झालेल्या टॅक्सी चालकाने चाकू काढून आकाशवर वार केले. आरोपी चालकाने आकाशवर एकदा नव्हे तर अनेक वेळा हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला आकाशचा मृत्यू
या घटनेनंतर मित्रांनी घाईगडबडीत आकाशला ट्रॉमा सेंटरमध्ये नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच दाखल झालेल्या सराय काले खान येथील पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. चाकूचा वार करून आरोपीने टॅक्सी सोडून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेतली असून तिच्या क्रमांकाच्या मदतीने पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिल्लीत केजी मार्ग-टॉल्स्टॉय मार्गावर एका कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरूणांना धडक दिली. त्यामुळे एक तरुण रस्त्यावर पडला तर दुसरा गाडीच्या छतावर पडला. त्यानंतरही चालकाने वाहन थांबवले नाही आणि कार तशीच चालवत राहिला. नंतर त्यांनी त्या तरुणाला इंडिया गेटजवळ फेकून दिले व ते पळून गेले. या घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे.