‘तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे… फोन येताच शिक्षिकेला हार्ट अटॅक
आग्रा येथून डिजिटल अरेस्टचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या गणवेशातील एका इसमाने महिलेला फोन केला आणि तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्याचे सांगितले. सुटकेसाठी 15 मिनिटांत 1 लाख रुपये देण्याचीही मागणी केली. मात्र फोनवरचं बोलणं ऐकताच..

सध्या टेक्नालॉजीच्या जमान्यात फसवणुकीचे प्रकारही खूप वाढले आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका सरकारी शाळेतील महिला शिक्षिकेला तब्बल चार तास डिजीटल अरेस्टमध्ये ठेवण्या आलं. आरोपने पोलिसांचा गणवेश घालून व्हॉट्सॲप कॉल केला. आणि त्या महिलेची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्याचे सांगितलं. तिला सोडवायचं असेल तर 15 मनिटांत 1 लाख रुपये पाठव अन्यथा तिचे व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकीही दिली. एवढंच नव्हे तर त्या महिलेला तिच्या मुलीचा आवाजही ऐकवण्यात आला, आई मला वाचव अशी विनवणी ती करत होती.
मात्र हे सर्व ऐकताच त्या महिलेला मोठा धक्का बसला आणि तिला हार्ट अटॅक आला. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मालती वर्मा असं मृत महिलेचं नाव असून ती 58 वर्षांची आहे. त्या राजकीय कन्या ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिकवायच्या. या घटनेनंतर त्यांच्या घरात कल्लोळ माजला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
4 तास डिजीटल अरेस्ट
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. तेथे डीपीवर पोलिसांच्या गणवेशातील व्यक्तीचा फोटो होता. मालती यांनी फोन उचलताच आरोपीने त्ायंना मुलीबद्दल सांगितलं. तुमची मुलगी सेक्स स्कँडलमध्ये अडकली आहे. तिला वाचवायचे असेल तर मी जसं सांगतो तसं करा. मात्र ते ऐकून मालती यांना मोठा धक्का बसला.
15 मिनिटांत द्या 1 लाख रुपये , व्हॉट्सॲप कॉलवरून मागणी
मृत महिलेच्या मुलाच्या सांगण्यानुसार, त्याच्या आईने फोनवरून त्याला याबद्दल सांगितलं. फोन करणाऱ्या आरोपीने त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे +92 असा कोड फोनवर दिसत होता, तो पाकिस्तानचा असल्याचे समजते. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.