मुंबईतली घटना | चोर फक्त घरात चोरीच करत नव्हता, तर चोराकडून घरातील १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कारही

चोरट्याची कृती पाहून पोलिस सुध्दा चक्रावले, पीडित मुलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर लैंगिक अत्याचार करीत असल्याचा आरोप करण्यात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील खरं सत्य उजेडात आणलं आहे. 'तिला दारू पाजायचा आणि अर्ध-बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार करायचा.'

मुंबईतली घटना | चोर फक्त घरात चोरीच करत नव्हता, तर चोराकडून घरातील १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कारही
crime newsImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 10:41 AM

मुंबई : चेंबूरमध्ये (chembur crime news) एक भयानक प्रकार घडला आहे, त्यामुळे चेंबूरमधील नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. 13 वर्षीय तरुणीवर तिच्या 19 वर्षीय मित्राने महिनाभर दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यावेळी हा प्रकार पोलिसांना (mumbai police) समजला, त्यावेळी त्यांना या प्रकरणातील गांभीर्य समजले. विशेष म्हणजे मुलगी घरी मे महिन्यात एकटी असताना हा प्रकार घडला आहे. ज्या तरुणावरती बलात्काराचा (Mumbai Crime news in marathi) आरोप झाला आहे, त्याला मुलीचे कुटुंबीय ओळखत होते. त्यामुळे त्याला घरात प्रवेश होता. त्याचबरोबर तरुणाने त्यांच्या घरातून काही वस्तू देखील चोरल्या आहेत.

मे महिन्यात पीडित मुलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्यावेळी पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यावेळी सत्य उजेडात आलं आहे. तो मुलगा त्या मुलीला भेटायचा. तिला दारू पाजायचा, ज्यावेळी ती अर्ध-बेशुद्ध अवस्थेत जाईल, त्यावेळी तिच्यावर बलात्कार करायचा अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

या कारणामुळे ही घटना उघडकीस आली

मुलीच्या घरातून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. काही वस्तू चोरीला गेल्याचं ज्यावेळी मुलीच्या आईवडिलांना तिला विचारलं, त्यावेळी मुलीने घरात झालेला सगळा प्रकार तिच्या आईवडीलांच्या कानावर घातला. त्यानंतर तात्काळ पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली, त्यानंतर तरुणाला ताब्यात घेतलं. तरुणाने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. तरुणाला मोबाईल खरेदी करायचा असल्यामुळे त्याने चोरी केली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

त्या तरुणाची पोलिस कसून चौकशी करीत आहे. त्याचबरोबर त्याने अजून असा कुठे प्रकार केला आहे का ? याची सुध्दा चौकशी करणार आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईवडीलांना मोठा धक्का बसला आहे. तरुणावरती पोलिसांनी बलात्कार, चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.