Video : दादागिरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! घरात घुसून तरुणीचं अपहरण, पाहा संतापजनक घटना

100 जण आले, घरात घुसले आणि 24 वर्षीय तरुणीच्या अपहरणाआधी भरदिवसा गुंडाची दादागिरी! कुठे घडला प्रकार?

Video : दादागिरीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! घरात घुसून तरुणीचं अपहरण, पाहा संतापजनक घटना
धक्कादायक घटनाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 10:58 AM

तेलंगणा : एका 24 वर्षांच्या तरुणीचं घरात घुसून तिच्या वडिलांच्या देखत अपहरण करण्यात आलं. या धक्कादायक आणि संतापजनक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केले जात आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला आहे. अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचं वय 24 वर्ष असून तिचं नाव वैशाली असल्याची माहिती समोर आली आहे.

तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात हा प्रकार घडला. आदिभटला परिसरातील एका घरात 100 पेक्षा जास्त लोकांनी घुसून घरातील सामानाची नासधूस केली. गाडीचीही तोडफोड केली. इतकंच नाही, तर या गुंडांना विरोध करणाऱ्या तरुणीच्या वडिलांनाही लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय वैशालीला जबरदस्ती काही जण घरात घुसून घेऊन गेले असल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी अधिकाऱ्यांकडून सध्या या व्हिडीओचा आधार घेत गुंडांची ओळख पटवली जाते आहे. वैशालीचं अपहरण करणाऱ्यांचा शोध घेण्याचं सध्या काम पोलिसांकडून केलं जातं आहे. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओ मध्ये काही तरुण घरात घुसून मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

रस्त्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वॅगेनार गाडीचीही मोडतोड करताना दिसून आले आहेत. तर सफेद शर्ट घातलेल्या एका व्यक्तीला जबर मारहाणकेली जात असल्याचं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय.

आरडाओरडा, झटापट आणि गोंधळ व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आला आहे. यावेळी काही तरुणांनी आपले चेहरे दिसू नयेत म्हणून चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचंही दिसून आलंय. आता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. मात्र अद्याप कोणलाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही.

अपहरण झालेल्या मुलीची पोलिसांना अवघ्या सहा तासांच्या आत सुटका केली. शुक्रवारी ही घटना घडली. नवीन रेड्डी नावाच्या तरुणाने आपल्या साथीदारांसह या तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. बळजबरी या तरुणीच्या घरात घुसून तिला पळवून नेण्यात आलं होतं. दरम्यान, नवीन रेड्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं कळतंय. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. अपहरण करण्यात आलेली तरुणी वैशाली ही प्रचंड धास्तावली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....