रात्री रेल्वे फलाटावर चार तरुण, चेहऱ्यावर थकवा, सत्य कळताच पोलिसांनाही दरदरून घाम फुटला
विजयवाडा रेल्वे स्थानकावर रात्री चार अल्पवयीन मुले सापडली. तेलुगु चित्रपट "लकी भास्कर" पासून प्रेरणा घेऊन, त्यांनी आपल्या हॉस्टेलमधून पळ काढला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केले. पोलिसांनी या मुलांची कसून चौकशी केली. आधी मुलं गांगरली. सांगायला तयार नव्हती, पण नंतर जे काही सांगितलं, त्याने पोलिसांनाही भर थंडीत घाम फुटला... काय घडलं असं?
भारतीय रेल्वे नेहमी खच्चू भरलेली असते. या रेल्वेतून दिवसातून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. असंख्य महिला, पुरुष आणि लहान मुलं प्रवास करतात. रोज गर्दीतून धक्काबुक्की करत प्रवास करतात. फलाटावरही त्यामुळे रोज प्रचंड गर्दी असते. असंख्य लोकांची रात्रच फलाटावर जाते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलीस चोवीस तास राऊंड मारत असतात. फलाटावर फिरत असतात. आमि रेल्वेतूनही फिरत असतात. जीआरपी आणि आरपीएफ पोलीस सतत गस्त घालत असतात. रेल्वेचं नुकसान होऊ नये आणि कोणताही घातपात होऊ नये यासाठी सतर्क असतात. पण त्याना आंध्रप्रदेशातील एका फलाटफॉर्मवर वेगळाच अनुभव आला आहे.
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममधील हायस्कूलचे चार अल्पवयीन मुले एका तेलुगु सिनेमाने प्रेरित होऊन हॉस्टेलमधून पळाले होते. ही सर्व मुले विजयवाडा रेल्वे स्थानकावर पोहोचले. सर्वजण प्लॅटफार्मवर बसले होते. त्यावेळी रात्री गस्तीवर असलेल्या जीआरपीची त्यांच्यावर नजर पडली. जीआरपी पोलिसांनी या मुलांची चौकशी केली. त्यावेळी मुलं गांगरलेली आणि घाबरलेली दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्यांना रेस्क्यू केलं. या मुलांची कसून चौकशी करण्यात आल्यावर मुलांनी सर्व कहाणी सांगितली. ही कहाणी असून पोलिसांनाच दरदरून घाम फुटला. पोलिसांनी अखेर या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या हवाली केलं. एका पोलीस अधिकाऱ्यानेच याबाबतची माहिती सांगितली.
‘लकी भास्कर’मुळे प्रभावित
खिशात 3600 रुपये टाकून ही मुलं विशाखापट्टणमच्या महाराणीपेटा येथील आपल्या हॉस्टेलमधून पळाले होते. लकी भास्कर हा तेलुगु सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील अभिनेता दुलकर सलमान याचा अभिनय पाहून त्याची नकल करण्याचा या चारही जणांनी प्रयत्न केला. श्रीमंत बनून कारमधून शाळेत जाण्याचं ते स्वप्न पाहत होते, अशी माहिती या मुलांनी पोलिसांना दिली. होस्टेलमध्ये सिनेमा पाहिल्यावर या मुलांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. हॉस्टेलच्या भिंतीवरून उड्या मारून या मुलांनी पलायन केलं, असं पोलिसांनी सांगितलं.
रात्री रेल्वे स्थानकात
शाळेच्या वसतिगृहातून पळालेल्या या मुलांकडे 3600 रुपये होते. त्यांनी हे पैसे खर्च केले. सर्व पैसे खर्च केल्यावर मंगळवारी ही मुले मंगळवारी रात्री विजयवाडा रेल्वे स्थानकात पोलिसांच्या टीमला सापडले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांना समजावलं आणि त्यानंतर बुधवारी या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या हवाली केलं. हे चाहरी मुलं इयत्ता नववीत शिकतात. तर एक मुलगा आठवीला आहे.