व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन दिले नाही, 10 वर्षाच्या मुलाने आईला थेट गोळीच घातली

अधिकृत माहितीनुसार, मुलाने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, 21 नोव्हेंबर रोजी चुकून गोळी झाडली होती, पण नंतर सांगितले की त्याने जाणूनबुजून त्याच्या आईवर गोळी झाडली होती.

व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन दिले नाही, 10 वर्षाच्या मुलाने आईला थेट गोळीच घातली
10 वर्षाच्या मुलाने केली आईची हत्याImage Credit source: google
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 3:50 PM

मिलवॉकी : आईने व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट खरेदी करुन देण्यास नकार दिल्याने एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील मिलवॉकी परिसरात ही घटना घडली आहे. अधिकृत माहितीनुसार, मुलाने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, 21 नोव्हेंबर रोजी चुकून गोळी झाडली होती, पण नंतर सांगितले की त्याने जाणूनबुजून त्याच्या आईवर गोळी झाडली होती. गेल्या आठवड्यात मुलावर फर्स्ट-डिग्री हेतुपुरस्सर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

विस्कॉन्सिन कायद्यानुसार, 10 वर्षांच्या मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल केला जातो. मात्र, मुलाचे वकील या संदर्भात बाल न्यायालयात दाद मागू शकतात. मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला मानसिक आजार असल्याचे सांगितल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, गोळीबाराची घटना 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाने सुरुवातीला अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याला त्याच्या आईच्या बेडरूममध्ये शस्त्र सापडले. त्यानंतर तो तळमजल्यावरच्या लॉन्ड्रीमध्ये गेला जिथे त्याची आई कपडे धुत होती.

हे सुद्धा वाचा

मुलाच्या मावशीने सांगितले की, जेव्हा ती मुलाशी बोलली तेव्हा त्याने बंदुकीच्या लॉक बॉक्सच्या चावीसह घराच्या चाव्या काढल्या. त्याने पुढे सांगितले की, त्याने तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या Amazon खात्यात लॉग इन केले आणि सकाळी ऑक्युलस व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटची ऑर्डर दिली.

त्याच दिवशी सकाळी त्याने आपल्या सात वर्षांच्या चुलत भावावरही हल्ला केला. मुलाच्या नातेवाईक आणि बहिणीने सांगितले की, आईच्या मृत्यूबद्दल तो कधीही रडला नाही किंवा त्याला कोणताही पश्चाताप झाला नाही.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.