panvel crime : गाडी चुकल्याची भयानक शिक्षा, आईसोबत झोपलेल्या बालीकेवर नराधमाकडून बलात्कार

गाडी चुकली म्हणून पनवेल रेल्वे स्थानकात फलाटा क्रमांक एक जवळ आईशेजारी झोपलेल्या तीन वर्षीय बालीकेला पळवून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

panvel crime : गाडी चुकल्याची भयानक शिक्षा, आईसोबत झोपलेल्या बालीकेवर नराधमाकडून बलात्कार
PANVEL STATIONImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:14 PM

मुंबई : पनवले रेल्वेस्थानकावर ( RAILWAY STATION ) गाडी चुकली म्हणून फलाटा शेजारी त्या दोघी मायलेकी झोपल्या होत्या. पहाटे मुली आई सकाळचा विधी उरकण्यासाठी गेल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने आई शेजारी झोपलेल्या अवघ्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडाला होता. या प्रकरणात पनवेल लोहमार्ग ( PANVEL GRP ) पोलीसांनी जुईनगर परिसरातून एका कचरा वेचणाऱ्या तरूणाला अटक केली आहे.

पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक शेजारी एक महिला तिच्या तीन वर्षांच्या बालिकेसह झोपली होती. पहाटे तीनच्या सुमारास ही महिला टॉयलेटसाठी गेली. जेव्हा ती परतली तेव्हा तिची मुलगी जागेवर नव्हती. त्यानंतर या महिलेने खूप शोधाशोध केली, परंतू तिची मुलगी काही सापडली नाही. त्यामुळे या महिलेने पनवेल जीआरपी पोलिसांकडे धाव घेतल्याचे पनवेल पोलिसांनी सांगितले.

बालीका सिमेंट बेंचवर बेशुद्धावस्थेत सापडली

या बालिकेचा शोध सुरू केला असता रेल्वे स्थानकाच्या पश्चिम देशाला ही बालीका सिमेंट बेंचवर बेशुद्ध अवस्थेत सापडली. या मुलीला तिच्या आईने रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणात जीआरपीने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही तपासल्यानंतर उघडकीस आले की आरोपी हा कचरा वेचणारा तरूण असून त्याने आई बालिकेसोबतच नसल्याचा फायदा घेत त्या मुलीला स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला नेले. आणि त्या बालिकेवर त्याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

कचरा वेचून गुजराण करणारा

पनवेल लोहमार्ग पोलिसांनी या आरोपीचा सर्वत्र शोध घेतला. सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला असता, जुईनगर परिसरातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपी 30 वर्षीय असून तो कचरा वेचून गुजराण करणारा आहे. तो सायन-पनवेल हायवेवरील कळंबोळी पुला खाली रहात असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे. पोलीसांनी त्याला अटक करून बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली ( POCSO)  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मायलेकी मूळच्या जळगावातील असून त्यांची गाडी चुकल्याने त्या दुसरी गाडी येण्याची वाट पाहात होत्या अशी माहिती पनवेल जीआरपीनी हिंदुस्थान टाईम्सला दिली आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.