पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, उत्तमनगर परिसरात चार आरोपींना अटक

पुण्यातील उत्तमनगर भागात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, उत्तमनगर परिसरात चार आरोपींना अटक
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरणImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 11:46 AM

पुणे / अभिजीत पोते : पुण्यात पुन्हा कोयता गँगने डोके वर काढले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी चार तरुण हातात कोयते घेऊन रस्त्यावर फिरत होते. आम्ही एरियामधील भाई म्हणत या चौघांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवल्याची घटना पुण्यातील उत्तमनगर भागात घडली आहे. पोलिसांनी या चारही जणांना अटक केली आहे. चंद्रकांत सुतार, सूरज गायकवाड, राहुल धोडगे आणि अथर्व यनपुरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चारही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांची कोणाशी तरी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या चारही जण त्या व्यक्तींना शोधण्यासाठी उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात या ठिकाणी आले. या परिसरात येताच त्यांनी त्यांच्याजवळील कोयते काढले आणि दुचाकीवरून परिसरात दहशत माजवली.

हातात कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली

“आम्ही या एरिया मधील भाई आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तर खाल्ल्यास करून टाकू”, असे म्हणत त्यांनी नागरिकांवर कोयते उगारले. दरम्यान, त्यांनी या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रिजवर पडलेला पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ गोंधळ घातल्यानंतर चौघांनी तिथून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

उत्तम नगर पोलिसांकडून चौघांना अटक

या घटनेची माहिती उत्तम नगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेत चौघाही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.