ICC Champions Trophy सुरु असताना पाकिस्तानात अतिरेकी सक्रीय, परदेशी नागरिकांना धोका
पाकिस्तानात आयसीसी चॅपियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. पाकिस्तानातील सध्याचे वातावरण पाहाता दहशतवादी सक्रीय झाल्याचे म्हटले जात आहे. अतिरेकी संघटना आता परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा प्रयत्न करु शकतात असा दावा पाकिस्तानी गुप्तचरांनी केला आहे.

पाकिस्तान ICC चॅपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धांचे यजमान पद भूषवित आहे. या स्पर्धांना मोठ्या संख्ये परदेशी खेळाडू आणि पर्यटक पाकिस्तानात जमा झाले आहेत.अशात आता या परदेशी नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटनेने (PIB)अलर्ट जारी केलेला आहे. इस्लामिक स्टेट खुरासान प्रांताने (ISKP)कथितरित्या पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होण्यास आलेल्या परदेशी नागरिकांना टार्गेट करण्याची योजना आखली जात आहे.
अतिरेकी संघटना कथितरित्या विदेशी नागरिकांच्या अपहरणाचा कट रचण्याचा प्रयत्न करीत आहे. खंडणीसाठी ISKP ही संघटना विशेष करुन परदेशी नागरिकांना विशेष करुन चीनी आणि अरब देशाच्या नागरिकांना टार्गेट करण्याची योजना आखत आहे.ही गुप्त माहीती लिक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
गुप्तचरांनी दिलेल्या माहीतीनुसार अतिरेकी गट ISKP शहरातील सीसीटीव्ही नसलेल्या परिसरात भाड्याने घरे घेऊन जेथे केवळ रिक्षा किंवा मोटर सायकल पोहचू शकते असा ठीकाणी राहाण्याचा प्रयत्न करीत आहे.




परदेशी नागरिकांचे अपहरण करुन त्यांना रात्रीच्या वेळी या भाड्याच्या घरात कोंडण्याचा प्रयत्न ही संसटना करीत आहे. अतिरेकी बंदरे, विमानतळ, कार्यालये, आणि हॉटेल्समधील विदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याच्या बेतात आहे. पाकच्या गुप्तहेर संघटनेने एकीकडे अशा प्रकारे सावधान केले असताना अफगाणिस्तानचे जनरल डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स (GDI) या गुप्तहेर संघटनेने ISKP ही अतिरेकी संघटना अफगाणिस्तानच्या प्रमुख ठिकाणांना टार्गेट करण्याच्या बेतात आहे.अफगान सरकारने तपास यंत्रणेना सार्वजनिक ठिकाणी सावधानता बाळगावी असे सावध केले आङे.
अशा हल्ल्यांसाठी पाकिस्तान आहे बदनाम
पाकिस्तानच्या इतिहासात मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, मार्च २०२४ मध्ये शांगला येथे चिनी अभियंत्यांवर अतिरेकी हल्ला झाला होता. तसेच २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावरही हल्ला झाला होता. दोन्ही घटनांमुळे पाकिस्तानातील सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या आणि परदेशी नागरिकांचे संरक्षण करण्याच्या पाकिस्तानच्या क्षमतेवर देखील नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.