ठाणे : आरोपी भीतीने कधी कोणता निर्णय़ घेईल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना भिवंडीत घडली. एटीएसने एका बोगस टेलिफोन एक्सजेंचवर छापा मारला. त्यानंतर आरोपी घाबरले. आता काय करावे काही सूचेना. काही जणांना स्वतःला अटक करून घेतली. पण, एक जण खूप घाबरला. त्याने पाचव्या माळ्यावरून थेट उडी मारली. त्याने उडी मारून स्वतःला का संपवलं. यामागचे गूपित अद्याप स्पष्ट झालं नाही.
एटीएसने भिवंडीतील एका बोगस टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केलाय. यावेळी त्यांनी काही लोकांना ताब्यात घेतले. एटीएसपासून बचावासाठी एका व्यक्तीने पाचव्या माळ्यावरून उडी मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थील जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही साहित्य जप्त केले.
मुंबई एटीएसला सूचना मिळाली होती. त्यानुसार, भिवंडीतील बोईवाडा पोलीस स्टेशन भागात गौरी पाडा येथे बोगस टेलिफोन एक्सचेंज सुरू आहे. माहितीनंतर एटीएसने छापा मारला.
पाचव्या माळ्यावरून उडी मारणाऱ्या व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला. भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला. एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे.
ज्या फ्लॅटमध्ये बोगस टेलिफोन एक्सचेंज सुरू होता त्या फ्लॅटला मालिक कुठं गेला याचा शोध पोलीस घेत आहेत. बोगस टेलिफोन एक्सचेंजसह सीम बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास भिवंडी पोलीस करत आहे.
या घटनेमुळे या बोगस टेलिफोन एक्सचेंजशी संबंधित लोकांचे धाबे दणाणले आहेत. मृतकाचा यात काय रोल होता. याचा तपास आता एटीएस करत आहे. शिवाय हे कुणाच्या नेतृत्वात चालत होते. हेही तपासले जाईल.
विशेष म्हणजे ज्याने उडी मारली त्याने काही वस्तू खाली फेकल्या. त्या किती महत्त्वाच्या होत्या. याही तपासल्या जातील. त्यानंतर खरा आरोप कोण आहे, याचा शोध घेतला जाईल.