Titwala Crime : रेल्वे ट्रॅकवरून चालत घरी जाणाऱ्या महिलेवर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पीडित महिला ही रात्रीच्या सुमारास चालत घराच्या दिशेने निघाली. तेव्हा ती पतीशी फोनवर बोलत असताना गाफील होती. मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत तिला ट्रॅकजवळील झाडीत ओढले आणि...

Titwala Crime :  रेल्वे ट्रॅकवरून चालत घरी जाणाऱ्या महिलेवर अत्याचार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 10:22 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, टिटवाळा | 15 नोव्हेंबर 2023 : शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामावरून थकून-भागून आलेल्या आणि घराच्या दिशेने पायी निघालेल्या एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर टिटवाळा पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला बेड्या ठोकल्या. निशांत चव्हाण असे नराधमाचे नाव (वय 35) असून त्याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरात महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. लोकलने प्रवास करणारी ही महिला रात्री तिच्या घरी जात असताना निशांत चव्हाण नावाच्या नराधमाने तिचा पाठलाग करत तिला रेल्वे ट्रॅक परिसरातील झाडीमध्ये खेचले आणि तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेत कल्याण रेल्वे पोलीसाच्या स्वाधीन केले. मात्र या प्रकरणानंतर पुन्हा एकदा स्टेशन परिसरात महिला सुरक्षेचा प्रश्न अहिराणी वरती आला असून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ग्रस्ती वाढवावी अशी मागणी रेल्वे संघटना कडून केली जात आहे.

पतीशी फोनवर बोलत घरी जात होती आणि तेवढ्यातच…

मिळालेल्या माहिती नुसार संबंधीत पीडित महिला ही शहाड येथे एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा येथे आली. स्टेशनवर उतरल्यानंतर ही महिला शेजारीच असलेल्या रेल्वे ट्रॅकवरून आपल्या घराच्या दिशेने निघाली. त्यावेळी एक व्यक्ती मागून तिचा पाठलाग करत होती. मात्र तेव्हा पीडित महिला पतीशी फोनवर बोलत असल्याने गाफील होती. अचानक मागून आलेल्या नराधमाने त्या महिलेच्या जवळ जाऊन तिला ट्रॅक शेजाील झाडीमध्ये खेचले. तिच्यावर अत्याचार करून तो फरार झाला.

पीडित महिलेने कसेबसे पोलिस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार कथन करत तक्रार नोंदवली. यानंतर टिटवाळा पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला.

दरम्यान महिलेच्या पतीला संबंधीत प्रकाराची माहिती मिळताच त्यांने परिसरात राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या टिटवाळा पोलिसांनी या आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

निशांत चव्हाण असे या आरोपीचं नाव असून त्याने यापूर्वीही असा काही गुन्हा केला का, याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी व जीआरपी पोलिसांनी स्टेशन परिसरात ग्रस्त वाढवा अशी मागणी रेल्वे संघटनेकडून केली जात आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.