Thane police : दोन बहिणींनी ज्वेलर्स दुकानदारांना अनेकदा गंडवलं, खर्च भागवण्यासाठी…, पोलिसही चक्रावले

| Updated on: Aug 04, 2023 | 7:51 AM

दोन बहिणींना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनाही शॉक बसला आहे. विशेष म्हणजे त्या दोन्ही मुली चांगल्या घरातील आहेत. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.

Thane police : दोन बहिणींनी ज्वेलर्स दुकानदारांना अनेकदा गंडवलं, खर्च भागवण्यासाठी..., पोलिसही चक्रावले
धुळ्यात दोन गटात दगडफेक
Follow us on

ठाणे : दोन बहिनींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पोलिसांनी (thane crime news) सीसीटिव्हीच्या आधारे केली असल्याची माहिती दिली आहे. दोन सख्या बहिणी ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दुकानदाराला बोलण्यात गुंतवायच्या आणि हातचलाखी करायच्या. त्या दोन बहिणी उल्हासनगर (latest ulhasnagar news) येथील रहिवासी आहेत. निशा (३१) आणि रेश्मा पुनवाणी अशी त्या दोघींची नावं आहेत. ज्यावेळी पोलिसांनी या दोघींची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी जे कारण सांगितलं, त्यामुळे पोलिस (thane police) सुध्दा चक्रावून गेले आहेत.

सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण महात्मा फुले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्या दोघींची कसून चौकशी सुरु आहे. दोन्ही मुली चांगल्या घरातील आहेत. त्यामुळे त्या चोरी करीत असतील असा प्रश्न सुरुवातीला पोलिसांना सुध्दा पडला होता.

कल्याण पश्चिम नारायणवाडी परिसरातील शंकलेशा ज्वेलर्समध्ये दोन दिवसांपूर्वी दोन अज्ञात महिला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखी करुन सोने चोरले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार त्या दुकानातील सीसीटिव्हीत कैद झाला. त्यानंतर दुकाने मालकाने तात्काळ ही माहिती पोलिसांच्या कानावर घातली. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणानंतर कल्याण मधील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दोन्ही बहिणींना त्यांच्या उल्हासनगरमधील घरातून अटक केली आहे. निशा पुनवाणी, रेश्मा पुनवाणी अशी या दोघीची नावे असून दोन्ही बहिणी सधन घरातील असून स्वतःची हौस मौज करण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी हा चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे उघड झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.