Thane Crime : धाडकन घरात घुसले आणि तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून फरार झाले… महिलेच्या अपहरणाने हादरलं शहर !

धाडकन घरात घुसून, एका ३० वर्षीय महिलेला कारमध्ये जबरदस्ती कोंबून तिचे अपहरण करण्यात आल्याचा धडकी भरवणारा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिस त्या महिलेचा आणि आरोपींचा कसून शोध घेत आहेत. आर्थिक वादातून हा गुन्हा घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Thane Crime : धाडकन घरात घुसले आणि तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून फरार झाले... महिलेच्या अपहरणाने हादरलं शहर !
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 3:52 PM

भिवंडी | 4 ऑक्टोबर 2023 : घरात सगळे निवांत बसलेत, अचानक घराचं मुख्य दार धाडकन उघडून सहा-सात माणसं आत येतात आणि एका व्यक्तीला खेचून जबरदस्ती बाहेर नेऊन कारमध्ये कोंबून भरधाव वेगाने निघून जातात. अपहरणाचा असा थरारक सीन आपल्यापैकी बहुतांश लोकांनी चित्रपट किंवा मालिकेत पाहिला असेल, ते पाहता आपल्याही अंगावर काटा येतो.

मात्र अशाच प्रकारचा एक गुन्हा मुंबईत घडला आहे, तोही अगदी दिवसाउजेडी… धाडकन घरात घुसून, एका ३० वर्षीय महिलेला कारमध्ये जबरदस्ती कोंबून तिचे अपहरण करण्यात आल्याचा धडकी भरवणारा प्रकार घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये ही घटना घडली असून पोलिसांच्या सांगण्यानुसार, ती महिला गेल्या १५ तासांपासून गायब आहे. मंगळवारी संध्याकाळी हे अपहरण नाट्य घडले. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिस त्या महिलेचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सदर महिला भिवंडी-कल्याण रोडवरील एका इमारतीत रहात होती. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चार महिलांसह सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ‘ घरात घुसल्यानंतर त्यांनी तिला जोरात खेचून खाली नेले आणि समोर उभ्या केलेल्या कारमध्ये जबरदस्ती बसवले. त्यानंतर ते सर्वच तेथून फरार झाले’ अशी माहिती पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. त्यानुसार, एफआयआर दाखल करण्यात आली.

आर्थिक वादातून घडला असावा गुन्हा 

या घटनेचा धक्का कमी होतो न होतो तोच पीडितेच्या मुलाला एक फोन आला. आई सुरक्षित परत यायलला हवी असेल तर तीन लाख रुपये दे, असे सांगत त्यांनी खंडणीची मागणी केली, असे पोलिसांनी नमूद केले. आर्थिक वादातून हा गुन्हा घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिस पीडितेला सोधण्याचा कसून प्रयत्न करत आहेत.

शांतीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वीच्या फसवणुकी प्रकरणी एकाला अटक

दरम्यान, 2021 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दाखल झालेल्या गृहनिर्माण कर्ज फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या चार आरोपींपैकी एक रिअल इस्टेट एजंटला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बनावट कागदपत्रे बनवून वित्तीय संस्थेकडून ५६ लाखांहून अधिकचे गृहकर्ज मिळविल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध विरारमधील अर्नाळा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला

नालासोपारा येथील विनोद मिश्रा या रिअल इस्टेट एजंटचा माग काढला आणि सोमवारी त्याला अटक केली, असे मीरा भाईंदर वसई विरार  पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे युनिटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.