कुख्यात गँगस्टर इजाज लकडावाला 2 कोटींच्या खंडणीचं प्रकरण भोवलं, ठाणे पोलिसांकडून अटक

कल्याण येथील व्यावसायिकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी इजाज लकडावाला अटक झाली आहे. Ezaz Lakdawala Thane Police

कुख्यात गँगस्टर इजाज लकडावाला 2 कोटींच्या खंडणीचं प्रकरण भोवलं, ठाणे पोलिसांकडून अटक
एजाज लकडावाला
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 6:39 PM

ठाणे: कल्याण येथील व्यावसायिकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी इजाज लकडावाला अटक झाली आहे. छोटा राजन टोळीतील कुख्यात गँगस्टर इजाज लकडावाला यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. लकडावाला याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे तिसहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.(Thane Police arrested Ezaz Lakdawala in two crore ransom case)

8 जानेवारी 2020 मध्ये लकडावाला यास मुंबई पोलिसांनी बिहार येथून अटक केली होती. तो तेव्हा पासून तळोजा कारागृहात आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यास तळोजा कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याच खंडणी प्रकरणात इजाज याचा चुलत भाऊ नदीम लकडावाला याचे देखील नाव समोर आले असून त्यास देखील लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.

मुंबईत 25 तर ठाण्यातही गुन्हे

इजाज लकडावाला हा मुंबईतल्या नागपाडा भागात राहत असल्याने त्याचे अनेक गँगस्टर बरोबर संबंध होते. मात्र, दाऊद व छोटा राजन टोळीत वैमनस्य पेटल्यानंतर इजाज छोटा राजन टोळीत सामील झाला होता. इजाजवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे 25 गुन्हे मुंबईत दाखल आहेत. तर ठाण्यात देखील त्याच्या विरोधात 5 ते 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

इजाज याच्यावर मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जानेवारी 2020 मध्ये त्याच्या बिहारमधून मुसक्या आवळल्या होत्या. तो तेव्हा पासून तळोजा कारागृहात बंद आहे.

दरम्यान, कल्याण मधील एका दूध व्यावसायिकाकडून 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात इजाज व नदीम लकडावाला ब्रदर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ठाणे खंडणी विरोधी पथकाने इजाज यास तळोजा कारागृहातून विशेष मोक्का न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.

संबंधित बातम्या:

इंटरनेटवर नोकरीची जाहीरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

सावधान, तुम्हीही बियर बारमध्ये ATM कार्ड स्वाईप करताय?

(Thane Police arrested Ezaz Lakdawala in two crore ransom case)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.