मुडदा बनला, डेथ सर्टिफिकेट मिळवले, चिता सजवली; पण…

आरोपी नीरज मोदीने गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केले होते. मात्र जेव्हा पोलीस मोदीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी दाखल झाले. तेव्हा त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला.

मुडदा बनला, डेथ सर्टिफिकेट मिळवले, चिता सजवली; पण...
शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीचा मृत्यूचा बनावImage Credit source: News 18
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 6:39 PM

बिहार : शिक्षेपासून वाचण्यासाठी एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने (Rape Accuse) जी शक्कल लढवली ते पाहून पोलिसही चक्रावून गेले. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी कथा बिहारमधील पिता-पुत्रांनी रचली. मात्र सत्य शेवटी उघड होतेच. त्याचप्रमाणे शिक्षेपासून सुटका मिळवण्यासाठी (To escape punishment) आरोपीने केलेला बनाव उघड झालाच. आरोपीची पोलखोल होताच आरोपीने भागलपूर कोर्टात आत्मसमर्पण (Surrender) केलं. नीरज मोदी असे या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीसोबत केले होते दुष्कर्म

आरोपी नीरज मोदीने गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केले होते. मात्र जेव्हा पोलीस मोदीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी दाखल झाले. तेव्हा त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. या कटात मोदीचे वडिल राजाराम मोदींनीही त्याला साथ दिली.

असा केला बनाव?

राजाराम मोदी यांनी आपला मुलगा मयत झाल्याचे सिद्ध केले. तसेच जिवंत मुलाला चितेवर झोपवून त्याचा फोटो काढला. चितेसाठी लागणाऱ्या लाकडाचे खरेदी बिल बनवले. लाकडाच्या बिलाच्या आधारे मुलाचे मृत्यूपत्र बनवले. हे मृत्यूपत्र भागलपूर कोर्टात सादर केले. यानंतर कोर्टानेही आरोपीला मयत समजून खटला बंद केला.

हे सुद्धा वाचा

पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर बनाव उघडकीस

मात्र पीडितेच्या आईने हार मानली नाही. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत होती. तिला संशय होता की, आरोपी जिवंत आहे. पिडितेच्या आईने आरोपीच्या मृत्यूपत्रावर आक्षेप घेत बीडीओकडे याबाबत तक्रार दाखल केली.

मृत्यूपत्राच्या चौकशीनंतर सत्य उघड

महिलेच्या तक्रारीनंतर बीडीओने या मृत्यूपत्राबाबत चौकशी सुरु करण्यात आली. चौकशीत आरोपीच्या वडिलांनी सादर केलेले मृत्यूपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. यानंतर आरोपीच्या पित्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

बनाव उघड होताच आरोपीचे आत्मसमर्पण

मृत्यूचा बनाव उघडकीस आल्याने आणि पित्याच्या अटकेनंतर आरोपी नीरज मोदीने स्वतःहून भागलपूर कोर्टात आत्मसमर्पण केले. ही घटना उघडकीस भागलपूरमध्ये सर्वच जण हैराण झाले आहेत.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.