नाशिक : जून 2013 मध्ये झालेल्या बाफणा हत्याकांडच्या आरोपींना नाशिक न्यायालयाने मरेपर्यन्त फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये दोघा आरोपींना ही शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विपिन बाफणा या तरुणाचे अपहरण करून एक कोटीची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्याने त्यांनी तरुणाच्या शरीरावर धारधार शस्राने वार करत हत्या केली होती. इतकेच काय त्या दरम्यान त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ सुद्धा चित्रित केला होता. धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा मुलगा विपीन बाफणाची हत्या झाली होती. विपीन हा नाशिकमधील एका नामांकित महाविद्यालायत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आरोपीने खंडणीसाठी पंचवटी येथून विपीनचे अपहरण केले होते, त्यानंतर कुटुंबाकडे खंडणी मागितली होती, बाफणा कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिल्याने आरोपींनी बिपिनची हत्या केली होती. दुसऱ्याच दिवशी विपिन याचा आडगाव शिवारात मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती.
नाशिक मधील बहुचर्चित विपीन बाफणा खून प्रकरणी नाशिक न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून मरेपर्यन्त फाशीची शिक्षा सुनावली आहे.
विपीन बाफणा याच्या खुनाच्या संदर्भात दोषारोप सादर करत असतांना व्हिडिओ, मोबाइल आणि सीम कार्ड याशिवाय इतर तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आला होता.
चेतन पगारे आणि अमन जट या दोघांना दोषी ठरविले असून इतर तिघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती.
विपीन बाफणा याचा खून केल्यानंतर संशयित आरोपींनी व्हिडिओ केला होता, त्यात दोन आरोपी दिसून आले आहेत, त्यामुळे खुणासाठी हा सबळ पुरावा ठरला आहे.
या खुनाच्या घटनेच्या शिक्षेचा निकाल आज दिला जाणार असल्याने कोर्टात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, हा निकाल लागल्यानंतर मोठ्या सुरक्षेत आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते.