11 वर्षाच्या मुलीची अपहरणानंतर हत्या, पोलीस आरोपीच्या शोधासाठी जंग जंग पछाडत होते; मात्र एका मिस्डकॉलने ‘असे’ उलगडले रहस्य

पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता शाळेत गेली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने घरच्यांनी तिची शोधाशोध सुरु केली. बराच शोध घेऊन मुलीचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली.

11 वर्षाच्या मुलीची अपहरणानंतर हत्या, पोलीस आरोपीच्या शोधासाठी जंग जंग पछाडत होते; मात्र एका मिस्डकॉलने 'असे' उलगडले रहस्य
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपी अटकImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 4:08 PM

दिल्ली : दिल्लीतील नांगलोई येथे 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता झालेल्या 11 वर्षीय मुलीच्या हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. मुलीच्या आईच्या फोनवर आलेल्या अज्ञात मिस्ड कॉलवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. रोहित उर्फ ​​विनोद असे 21 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने घटनेची कबुली दिली असून, मुंडका गावातील घेवरा मोडजवळ मृतदेह सापडला होता. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

चौकशीत हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून, घटनेपूर्वी आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याची भीती पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मृत मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच आरोपींवर दोषारोप निश्चित केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

शाळेत जात असताना अपहरण

पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता शाळेत गेली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने घरच्यांनी तिची शोधाशोध सुरु केली. बराच शोध घेऊन मुलीचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंद करत मुलीचा शोध सुरु केला.

हे सुद्धा वाचा

मिस्ड कॉलने उलगडले रहस्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या आईला चुकून कॉल केला होता. परंतु रिसिव्ह करण्यापूर्वीच तो कॉल डिस्कनेक्ट केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी हा संशयास्पद क्रमांक ट्रेस केला. हा नंबर पंजाब आणि मध्य प्रदेशात फिरत होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी विशेष पथक तयार करून या दोन्ही राज्यात छापे टाकले आणि आता 21 फेब्रुवारीला आरोपीला अटक करण्यात आली.

आरोपीने पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली तर दिलीच, पण मुंडक्याच्या घेवरा वळणजवळ मृतदेह जप्त केला. 12 दिवसांपूर्वी खून झाला असल्याने मृतदेह कुजलेला अवस्थेत होता. मृतदेहाची स्थिती पाहता बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे दिसते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.