अल्पवयीन मुलीला आयुष्यातून उठवलं, अत्याचार करणाऱ्या मानेला दीड तासात अटक

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजय नगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करीत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली.

अल्पवयीन मुलीला आयुष्यातून उठवलं, अत्याचार करणाऱ्या मानेला दीड तासात अटक
Follow us
| Updated on: Aug 24, 2024 | 6:38 PM

एकीकडे कोलकाता आणि बदलापूरातील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी समाजमन हादरले असताना आता सांगली शहर देखील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने हादरले. एका अल्पवयीन मुलीवर 34 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले. घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी करीत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

सांगली शहरात एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची प्रकार उघडकील आला. या नंतर नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणा बाजी केली. त्यानंतर या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने यास गुन्हा दाखल होताच दीड तासात ताब्यात घेतले. संशयित आरोपी संजय माने 2011 साली प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 14 वर्षाची शिक्षा देखील लागली आहे. तो सध्या पॅरोल रजेवर बाहेर आला होता.

गेल्या महिन्यात झाली होती ओळख

गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून त्याने तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत पीडीत मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. काल 23 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्याने पीडीत मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडीत मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.