कामगाराकडून कारखान्यातील सोन्यावर डल्ला, आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले…

मालकाच्या कारखान्यात सोने चोरुन फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी जी शक्कल लढवली ती पाहून तुम्हीही चकित व्हाल.

कामगाराकडून कारखान्यातील सोन्यावर डल्ला, आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले...
सोने चोरणाऱ्या चोरट्याला हावडा येथून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 10:08 AM

मुंबई / गोविंद ठाकूर : कामगारांनीच कारखान्यातील सोन्यावर डल्ला मारल्याची घटना बोरीवलीत उघडकीस आली आहे. सोने घेऊन कामगार पळून गेलेल्या आरोपीवर पोलिसांनी ट्रेनमध्येच झडप घातली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधील हावडा येथून अटक केली आहे. आरिफ सलीम शेख आणि सलमान सुकूर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीने एकूण 95 ग्रॅम सोने चोरुन नेले होते. त्यापैकी 40 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. बाकी 55 ग्रॅम सोने कोणाला विकले आणि या प्रकरणात किती लोकांचा समावेश आहे, याबाबत एमएचबी पोलीस तपास करत आहेत.

कारखान्यातून 95 ग्रॅम सोने चोरले

बोरीवली पश्चिमेकडील वैशाली इंडस्ट्रीजमधील सोन्याच्या कारखान्यातून 28 फेब्रुवारी रोजी 95 ग्रॅम सोने घेऊन कारागीर फरार झाला. चोरी केलेले सोने तो पश्चिम बंगालला निघून गेला. सोने चोरी झाल्याचे लक्षात येताच मालकाने एमएचबी पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला.

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी हावडा गाठले

एमएचबी पोलिसांनी तातडीने कारखान्यात पोहोचून सीसीटीव्ही तपासले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी अहमदाबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरही एमएचबी पोलीस अहमदाबादला पोहोचले. जेथे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी सापडला नाही. आरोपीचे पुन्हा तांत्रिक विश्लेषण केले असता ते ठिकाण हावडा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ विमानाने हावडा गाठले.

हे सुद्धा वाचा

चोरला पकडण्यासाठी पोलीस बनले भेल विक्रेता

आरोपीच्या शोधासाठी पोलील बनले भेल विक्रेता

तेथे एमएचबी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेलपुरी वाल्याचा वेश परिधान करत ट्रेनच्या स्लीपर आणि जनरल डब्यांची तपासणी केली. मात्र आरोपी सापडला नाही. त्यानंतर एमएचबी पोलिसांनी थ्री टियर एसी कोचमध्ये आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी आरोपी तेथे दिसून आला. तक्रारदारानेही आरोपीला ओळखले. यानंतर एमएचबी पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर सोने खरेदी करणाऱ्या खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.