कंटेनर उघडताच ATS चे अधिकारी चक्रावून गेले; गुजरातच्या बंदराजवळ 350 कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हा ड्रग्ज साठा पकडला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ एका कंटेनरमध्ये हे हिरॉईन सापडले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने बंदरावर धाड टाकत कंटेनरची तपासणी केली असता हे ड्रग्ज सापडले. कंटेनर उघडताच ATS चे अधिकारी चक्रावून गेलेय. यात तब्बल 70 किलो हेरॉईन साठा आढळून आला.

कंटेनर उघडताच ATS चे अधिकारी चक्रावून गेले; गुजरातच्या बंदराजवळ 350 कोटींचे ड्रग्ज जप्त
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:09 PM

अहमदाबाद : देशभरातील ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने(The anti-terrorist squad ) (एटीएस) कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकत एटीएस( ATS) ड्रग्ज माफियांचे रॅकेट खिळखिळे करत आहे. मात्र. अद्यापही परदेशातून मोठ्या प्रमाणात भरातामध्ये ड्रग्जची तस्करी सुरु आहे. गुजरातच्या(Gujarat ) बंदराजवळ एटीएसने तब्बल 350 कोटींचे हेराईन( heroin )(ड्रग्ज) जप्त केले आहेत. एटीएसची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यापू्र्वी 3,000 किलो हेरॉईन जप्त केले होते. अफगाणिस्तानातून भारतात पाठवण्यात आले होते. इंटरनॅशन मार्केटमध्ये या हेराईनची किंमत 21,000 कोटी रुपये होती.

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हा ड्रग्ज साठा पकडला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ एका कंटेनरमध्ये हे हिरॉईन सापडले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने बंदरावर धाड टाकत कंटेनरची तपासणी केली असता हे ड्रग्ज सापडले. कंटेनर उघडताच ATS चे अधिकारी चक्रावून गेलेय. यात तब्बल 70 किलो हेरॉईन साठा आढळून आला.

या कारवाईत एटीएसच्या पथकाने सुमारे 70 किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेराईनची किंमत सुमारे 350 कोटी रुपये आहे. एका अधिकाऱ्याने या कारवाईची माहिती दिली. एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

बंदरात आलेल्या एका शिपिंग कंटेनरची एटीएस अधिकाऱ्यांनी झडती घेतली. हा कंटेनर काही वेळापूर्वी दुसऱ्या देशातून आला होता. कंटेनर बंदराबाहेरील मालवाहतूक पुरवठा केंद्रात पार्क करण्यात आला होता. यानंतर तपासणी दरम्यान हा मोठा ड्र्ग्ज साठा आढळून आला.

एटीएस, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यासह विविध राज्य आणि केंद्र सरकारच्या एजन्सीजने अलीकडच्या काही दिवसांत इतर देशांमधून गुजरात बंदरांवर येणाऱ्या शिपिंग कंटेनरमधून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

डीआरआयने गतवर्षी सप्टेंबरमध्ये मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून सुमारे 3,000 किलो हेरॉईन जप्त केले होते. ते अफगाणिस्तानमधून आले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 21,000 कोटी रुपये होती.

नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्त, गुन्हे शाखेकडून तीन आरोपी अटक

नागपुरात एमडी ड्रग्स पावडरची तस्करी केली जाणार आहे, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. गुन्हे शाखेचे एक पथक खापरी परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर तैनात करण्यात आले होते. खबऱ्याने माहिती दिलेले आरोपी तेथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीचे उत्तरं देत होते. संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या कारची झडती घेतील असता त्यामध्ये 250 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.