शारजा ते कोच्ची प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशाकडे सापडली ही काळी अंडी, त्यांची किंमत 43 लाख रूपये आहे

| Updated on: Feb 20, 2023 | 4:44 PM

अलीकडे विमानतळावरून तस्करीच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. कोच्ची एअरपोर्टवर उतरलेल्या एका प्रवाशाकडे काळ्या सोन्याची अंडी सापडली आहेत. कसली आहेत नेमकी ही अंडी..

शारजा ते कोच्ची प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशाकडे सापडली ही काळी अंडी, त्यांची किंमत 43 लाख रूपये आहे
BLACK EGG
Image Credit source: socialmedia
Follow us on

केरळ : केरळचे प्रवासी आखाती देशात जाऊन धनदौलत कमवून पुन्हा देशात येत असतात. परदेशातून मायदेशात पैसे पाठवण्यात भारत जगात नंबरवन आहे. परंतू काही वेळा कर चुकवून सोन्यासारख्या वस्तूंची आयात केली जात असते. अशाच एका प्रकरणात शारजातून विमानाने आलेल्या एका प्रवाशाकडून कोच्ची कस्टम विभागाने काळी अंडी जप्त केली आहेत. या अंड्यांची किंमत 43 लाख रूपये इतकी आहे. ही काळी अंडी नॉर्मल अंडी नसून यात काहीतरी संशयास्पद सापडणार म्हणून या प्रवाशाची अधिक झडती सुरू झाली आणि अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

केरळच्या कोच्ची विमानतळावर शारजातून आलेल्या एका प्रवाशांची झडती घेतली असताना कस्टमच्या अधिकाऱ्यांना काळी अंडी सापडली. या अंड्याची तपासणी केली असताना अधिकाऱ्यांना त्यात काळ्या रंगाच्या घटकात काही लपवलेले आढळले. ही काळी अंडी नॉर्मल अंडी नसून यात काहीतरी संशयास्पद सापडणार म्हणून या प्रवाशाची अधिक झडती सुरू झाली.

विमान प्रवाशाकडे सापडलेल्या अंड्याचे वेष्ठन एका विशिष्ट प्रकाराचे बनवलेले आढळले. ते उघडून पाहीले असता त्यात कस्टमच्या अधिकाऱ्यांना सोने लपवलेले आढळले. या चार काळ्या अंड्यात लपवलेल्या सोन्याची किंमत 43 लाख रूपये आहे. यात कस्टम विभागाला 900.25  ग्रॅम सोने लपवलेले आढळले.

रविवारी शारजावरून आलेल्या जी – 9426  मधील एका प्रवाशाची ग्रीन चॅनलमध्ये तपासणी केली असता तेव्हा त्यांच्याकडे संशयास्पद चार काळी अंडी आढळली. हुसेन असे या प्रवाशाचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हुसेन केरळच्या पल्लकडचा रहिवासी आहे. त्याच्याकडे सापडलेल्या सोन्या संदर्भात त्याचे कुठल्या तस्करी करणाऱ्या टोळीशी तर संबंध नाही याची चौकशी केली जात आहे.

गेल्या पाच दिवसातील तस्करीचे हे पाचवे प्रकरण आहे. 17 फेब्रुवारी रोजी 20 लाख रूपयांचे सोने जप्त झाले होते. तीन दिवसांपूर्वी एका अन्य घटनेत कोच्ची एयरपोर्टवर 43 लाख रूपयांचे 857 ग्रॅम सोने सापडले होते. अलीकडे विमानतळावरून तस्करीच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे.