Pune Crime : मित्राच्या मोटरसायकलवरुन आला, पुलावर गेला अन् काही क्षणात…, तरुणासोबत नेमकं काय घडलं?

नेहमीप्रमाणे घरुन गेलेला तरुण घरी परतलाच नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाच्या मृत्यूची बातमी आली. यानंतर गावावर शोककळा पसरली.

Pune Crime : मित्राच्या मोटरसायकलवरुन आला, पुलावर गेला अन् काही क्षणात..., तरुणासोबत नेमकं काय घडलं?
पुण्यात जलाशयात तरुणाचा मृतदेह आढळलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 1:26 PM

पुणे / 19 जुलै 2023 : नेहमीप्रमाणे घरुन कामावर गेलेला तरुण घरी परतलाच नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी जलाशयात त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आकाश पांडुरंग लष्करे असे 25 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. जुन्नर तालुक्यातील ओझर येथे येडगाव जलाशयामध्ये आकाशचा मृतदेह आढळून आला आहे. आकाशसोबत नेमंक काय घडलं हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी ओतूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. ओतूर पोलीस अधिक तपास करत आहेत. आकाशच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आकशने स्वतःहून जीवन संपवले की घातपात झाला याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

बाईक पुलाजवळ होती तर मृतदेह जलाशयात

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथे आकाश हा आपल्या आईसोबत राहत होता. आकाशच्या वडिलांचे निधन झाले होते. तर बहिण विवाहित आहे. आकाश एका किराणा दुकानात मार्केटिंगचे काम करत होता. काल आकाश मित्राची बाईक घेऊन घरुन गेला. यानंतर आकाशची बाईक ओझर पुलाजवळ आढळली. तर आकाशचा मृतदेह जलाशयात आढळला. घटनेची माहिती मिळताच धनगरवडीचे सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके, मयूर शेळके, नामदेव पाटोळे, इंद्रजित शेळके, सुभाष दळवी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाण्यामधून आकाशचा मृतदेह बाहेर काढला.

तपासाअंती आत्महत्या की घातपात स्पष्ट होईल

आकाश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आकाशच्या जाण्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आकाशने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र आकाशवर कोणतेही कर्ज नव्हते किंवा त्याचा कुणासोबतही वाद नव्हता. मग आकाशने जर खरंच आत्महत्या केली असेल तर यामागे काय कारण असेल याचा पोलीस तपास करत आहेत. तपासाअंती आकाशने नक्की आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात झाला, हे स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.