दोन दिवसापूर्वी खेळायला गेलेली चिमुकली घरी परतलीच नाही, आज थेट मृतदेहच आढळला

साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील आठ वर्षाची मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत होती. सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली.

दोन दिवसापूर्वी खेळायला गेलेली चिमुकली घरी परतलीच नाही, आज थेट मृतदेहच आढळला
खेळायला गेलेली चिमुकली घरी परतलीच नाहीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 2:50 PM

भंडारा : घराशेजारील परिसरात खेळायला गेलेल्या बेपत्ता मुलीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथे उघडीस आली आहे. मयत मुलगी सोमवारपासून बेपत्ता होती. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साकोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे.

सोमवारी सायंकाळी खेळायला गेली होती

साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथील आठ वर्षाची मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत होती. सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली. मात्र घरी परत आलीच नाही.

रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही

रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने घटनेची माहिती साकोली पोलीस विभागाला देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री 10.30 वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले.

हे सुद्धा वाचा

आज जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

शोध मोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांना दिसला.

अज्ञात आरोपींचा शोध सुरु

गावकऱ्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान हा मृतदेह बेपत्ता चिमुकलीचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....