बेवफाई नहीं करने का म्हणत माथेफिरु प्रियकराने केले ‘हे’ भयंकर कृत्य, वाचा नेमके काय घडले?

जबलपूरमधील प्रसिद्ध मेखला रिसॉर्टमध्ये तरुणीच्या हत्येशी संबंधित खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर माथेफिरु प्रियकराने व्हिडिओ बनवला.

बेवफाई नहीं करने का म्हणत माथेफिरु प्रियकराने केले 'हे' भयंकर कृत्य, वाचा नेमके काय घडले?
प्रियकराने प्रेयसीची हत्या करत व्हिडिओ बनवलाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 3:03 PM

जबलपूर : बेवफाई नही करने का म्हणत एका माथेफिरु प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये उघडकीस आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर त्याने व्हिडिओ बनवत त्याने धोका दिल्यास काय होते हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओमध्ये शिवीगाळ करत तो रक्ताने माखलेला प्रेयसीचा मृतदेह दाखवत आहे. त्यानंतर आरोपीने प्रेयसीचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर टाकत धोका देत होती असे लिहिले.

हॉटेलमध्ये झालेल्या हत्येसंबंधी व्हिडिओ व्हायरल

जबलपूरमधील प्रसिद्ध मेखला रिसॉर्टमध्ये तरुणीच्या हत्येशी संबंधित खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर माथेफिरु प्रियकराने व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तरुणाने मुलीच्या बेवफाईचा उल्लेख करत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हत्या झाल्याचे उघड

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेखला रिसॉर्टमधील एका खोलीत 6 नोव्हेंबरला आलेल्या जबलपूर येथील तरुणीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरु

घटनेनंतर आरोपी तरुण तेथून फरार झाला आहे. अभिजीत पाटीदार असे त्याचे नाव असून, हॉटेलच्या रेकॉर्डनुसार तो गुजरातचा रहिवासी आहे. हत्येनंतर तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंट दुसरे कोणीतरी वापरत आहे. नुकतेच इंस्टाग्राम आयडीवर काही फोटोही शेअर केले आहेत. तरुणीचे इन्स्टाग्राम आयडी तिचा प्रियकरच वापरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.