लग्नानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच मुल जन्माला आले, असा कसा झाला गडबड घोटाळा
निकोप समाजासाठी या घटना विचलित करणाऱ्या असून मुलगी गर्भवती असल्याचे माहीती असूनही तिचे लग्न दुसऱ्याशी लावणे यासाठी केवळ ती मुलगीच जबाबदार नसून तिचा परिवारही तितकाच दोषी आहे.

दिल्ली : मोठ्या धुमधडाक्यात लग्नाची वरात निघाली. लग्नाची वरात मोठ्या धुमधडाक्यात निघाली. नवरीच्या घरात मोठ्या थाटात वरातीचे स्वागत झाले. लग्नाचे सात फेरे, कन्यादान आणि नंतर मुलीची सासरी पाठवणूक झाली, नवरी पारंपारिक पद्धतीने सासरी आली. सासरी तिचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. परंतू वधूचा चेहरा अचानक पिवळा पडला आणि तिच्या पोटात दुखू लागले. ही साधे पोट दुखणे नव्हते तर होत्या प्रसवकळा. त्यानंतर चोवीस तासातच घरात एक नविन पाहुणा आला. एका नवजात बाळाने जन्म दिला.
प्रत्येकाची इच्छा असते की लग्न झाल्यावर त्यांच्या घरी नव्या पाहुण्याच्या आगमनाने हरखून जावे. परंतू येथे तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीने बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली. लग्नाला 24 तास उलटले नव्हते. अजून लग्नाचे काही विधीही देखील पूर्ण झाले नव्हते आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका नववधूने मुलीला जन्म दिला होता. संपूर्ण कुटुंबालाच हा सर्वात मोठा धक्का होता.
ग्रेटर नोएडात 24 तासांत वधू आई बनली
जिला वधू म्हणून डोलीतून घरी आणले ती लागलीच दुसऱ्याच दिवशी वधू झाल्याने ग्रेटर नोएडातील दनकौर येथील कुटुंबाला धक्का बसला आहे. सोमवारी लग्न झाले आणि मंगळवारी नवरीने एका मुलीला जन्म दिला. वराच्या कुटुंबियांनी वधूच्या कुटुंबावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. वधू बुलंदशहरची रहिवासी असून या घटनेनंतर ती माहेरी गेली आहे.
हरियाणाच्या अंबालातही फसवणूक
नोएडातच नव्हे तर हरियाणाच्या अंबाला येथेही अशीच फसवणूक झाली आहे. वेलेंटाईनच्या दिवशी येथे लग्न झाले. सासरी लग्नाचे विधी सुरु असतानाच वधूच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिला दवाखान्यात नेले असताना ती नऊ महीन्याची गरोदर असल्याचे उघड झाले. रुग्णालयात ती प्रसुत झाली. आम्हालाही ती गर्भवती असल्याचे माहीती नव्हते असे माहेरचे लोक म्हणाले, नंतर मुलीने सांगितले तिच्या शेजारच्या लग्न झालेल्या इसमाशी तिचे संबंध होते.
कानपूरलाही दहा दिवसात मुल जन्मले
उत्तर प्रदेशातील कानपूरातही रुरा गावांत लग्नानंतर दहा दिवसात एका नववधूने एका मुलाला जन्म दिला. या घटनेने संपूर्ण कुटुंब धक्क्यात असताना या मुलीने सांगितले की गावातील काही मुलांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने तिला दिवस गेले होते.
समाजासाठी धोकादायक
या घटना कायद्याने गुन्हेच आहेत. निकोप समाजासाठी या घटना विचलित करणाऱ्या असून मुलगी गर्भवती असल्याचे माहीती असूनही तिचे लग्न दुसऱ्याशी लावणे यासाठी केवळ ती मुलगीच जबाबदार नसून तिचा परिवारही तितकाच दोषी आहे.