मनोज गाडेकर, शिर्डी : बहिण -भावाचा काही कराणाने वाद झाला. या रागातून भावाने बहिणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिर्डीत मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. श्रृत कोलथे असे आरोपी भावाचे नाव आहे. शिर्डी पोलिसात भावाविरोधात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला येवला येथून अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे..
दोन्ही बहिण-भावामध्ये नेहमी भाडंणे होत होती. मात्र कालच भांडण थेट बहिणीच्या जीवावरच बेतलं आहे. मयत मुलीची आई ही विभक्त राहत असून, ती कामानिमित्त बाहेर असल्याने घटना घडल्यानंतर फोनवर संपर्क साधून तिला बोलावून घेतले. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरात कोण कोण सदस्य आहेत याची माहिती घेतल्यानंतर श्रृत हा अगोदरच बाहेर असल्याचे श्रृतच्या आईने पोलिसांना सांगितले. त्याच्याशी वारंवार संपर्क करून त्याचा फोन बंद असल्याने पोलिसांना नेमकं काय घडलं हे सुरूवातीला लक्षात आले नाही.
मध्यरात्री येवला पोलीस गस्तीवर असताना श्रृतच्या कपड्यावर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. येवला पोलिसांना त्याला नंतर शिर्डी पोलिसांकडे तपास कामी सुपूर्द केले. शिर्डी पोलिसांनी आरोपी श्रृत कुलथे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धुधाळ यांनी सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.