…म्हणून संतापलेल्या भावाने तरुणाला भोसकले, धुळ्यातील ‘त्या’ तरुणाच्या हत्याकांडप्रकरणी धक्कादायक खुलासा

मोहाडी परिसरातील सतिश मिस्त्री या तरुणाची मुंडके छाटून काल निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अवधान शिवारात शिर नसलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.

...म्हणून संतापलेल्या भावाने तरुणाला भोसकले, धुळ्यातील 'त्या' तरुणाच्या हत्याकांडप्रकरणी धक्कादायक खुलासा
धुळ्यातील तरुणाच्या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 6:10 PM

धुळे : बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून धुळ्यात भावाने एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल तरुणाचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु केला. सखोल तापासानंतर 12 तासात या हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. सतिश मिस्त्री असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सतिशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. चेतन गुजराती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून हत्या

सतिश हा चेतनच्या बहिणीबद्दल उलट सुलट बोलून तिची बदनामी करत असे. याच रागातून चेतनने अल्पवयीन आरोपीच्या मदतीने सतिशची हत्या केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोहाडी पोलिसांच्या मदतीने अवघ्या 12 तासात मारेकऱ्याचा छडा लावला. या प्रकरणी चेतन गुजरातीसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली.

अवघ्या 12 तासात हत्येचा उलगडा करत आरोपीला अटक

मोहाडी परिसरातील सतिश मिस्त्री या तरुणाची मुंडके छाटून काल निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अवधान शिवारात शिर नसलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात खुनाचा उलगडा लावला असून, आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा

बहिणीच्या मागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाची हत्या

तरुणीच्या मागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या एका तरुणाची मुलीच्या भावाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी परिसरात घडली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयितास ताब्यात घेतले आहे. विकास रमेश नलावडे असे हत्या करण्यात आलेल्या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. एका तरुणीवर विकास याचे प्रेम होते. त्याला संबंधित तरुणीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे विकासने सतत तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. ही बाब मुलीच्या भावाला समजल्याने त्याने विकासचा काटा काढला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.