Malegaon | श्वानाला वाचवण्याच्या चक्करमध्ये कार थेट विहिरीत, ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे वाचला तिघांचा जीव!
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून मालेगावकडे येत असतांना रात्री नऊ वाजेच्या सुमारास वऱ्हाणे गावालगत कारच्या समोर अचानक श्वान आडवा आल्याने चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी महामार्गालगत असलेल्या 60 ते 70 फुट खोल विहिरीत कार कोसळली. कार कोसळली त्यावेळी विहिर पाण्याने तुडूंब भरलेली होती.
मालेगाव : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ एक धक्कादायक घटना घडलीयं. रस्त्यात आलेल्या श्वानाला वाचवितांना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत कोसळली. सुदैवाने कारमधील तिघांना वाचविण्यात यश आले. अपघातग्रस्त कारमधील (Car) तिघेही मालेगाव येथील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळतंय. हे तिघेही औरंगाबादकडून मालेगावला जात होते. मात्र, अचानकच रस्तावर कारसमोर श्वान आल्याने त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये कार चालकाचे कारवरील नियंत्रण (Control) सुटल्याने कार थेट विहिरीमध्ये पडली. विहिरीमध्ये भरपूर पाणी होते.
औरंगाबादहून मालेगावकडे जात असताना घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून मालेगावकडे येत असतांना रात्री नऊ वाजेच्या सुमारास वऱ्हाणे गावालगत कारच्या समोर अचानक श्वान आडवा आल्याने चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी महामार्गालगत असलेल्या 60 ते 70 फुट खोल विहिरीत कार कोसळली. कार कोसळली त्यावेळी विहिर पाण्याने तुडूंब भरलेली होती. कार विहिरीत कोसळतांना मोठा आवाज देखील झाला.
ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे वाचले तिघांचे प्राण
कार विहिरीत कोसळल्याचा आवाज ऐकून गावातील नागरिकांनी धावत जावून तत्काळ मदतकार्य केले. सुदैवाने कार मधील तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तिघेही खाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना त्यांची ओळख देखील सांगता येणे अवघड झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कारमधील तिघांना तत्काळ मालेगाव येथे रवाना करण्यात आले. मात्र, यातिघांची नावे अद्याप कळू शकली नाहीयंत.