धनादेश दिला पण ती एक चुक नडली, पैसे तर द्यावेच लागले पण… दहा वर्षांनी निकाल लागलेलं प्रकरण काय ?
2012 साली कल्याण येथील एका ठेकेदाराने भाडे तत्वावर दिलेले डम्पर आणि एक्झिक्युटर मशीनच्या भाडे पोटीची रक्कम दिली नव्हती. त्यावरून तडजोड करत ही रक्कम 17 लाखांवर आली होती.
नाशिक : अनेकदा धनादेश बिनधास्तपणे दिला जातो. तो जर वटला ( Bounce Cheque ) नाही तर त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेत नाही. पण नाशिक मध्ये नुकताच न्यायालयाने ( Nashik Court ) एक निकाल दिला आहे. बारा वर्षांपूर्वी दाखल झालेल्या प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. धनादेश न वटल्याप्रकरणी कल्याणच्या एका ठेकेदाराला 25 लाखांचा दंड आणि एका दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. धनादेश देऊन तो न वटल्याने काय दणका बसू शकतो त्यासाठी हे उदाहरण असल्याची चर्चा आता नाशिकमध्ये होऊ लागली आहे.
2012 साली कल्याण येथील एका ठेकेदाराने भाडे तत्वावर दिलेले डम्पर आणि एक्झिक्युटर मशीनच्या भाडे पोटीची रक्कम दिली नव्हती. त्यावरून तडजोड करत ही रक्कम 17 लाखांवर आली होती.
त्यानंतर कल्याणच्या ठेकेदाराने नाशिकच्या व्यक्तीला 17 लाखांचा धनादेश दिला होता. मात्र तो धनादेश वटला नाही. त्यानंतर नाशिकमधील बालाजी अर्थ मुव्हर्सचे शशिकांत कोमिनीनी गांधी यांनी कोर्टात धाव घेतली होती.
त्यामध्ये कल्याण येथील ठेकेदार दीपक बंडू लोखंडे यांना नाशिकच्या न्यायायलयाने शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. तब्बल 12 वर्षांनी यामध्ये तक्रारदार गांधी यांना न्याय मिळाला आहे.
दीपक लोखंडे यांना 25 लाख रुपयांचा दंड आणि एक दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर दंड भरला नाही तर तीन महीने साध्या कारावास भोगावा लागणार आहे. त्यामुळे धनादेश प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिक मधील बालाजी अर्थ मुव्हर्सचे शशिकांत कोमिनीनी गांधी यांनी कल्याण येथील डम्पर, टाटा हिटाची एक्झिक्युटर मशिन भाड्याने दिली होती. त्यामध्ये 31 लाख 9 हजार थकीत होते. त्यावरून लोखंडे यांनी गांधी यांना धनादेश दिला होता.
नुकतीच नाशिकच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. त्यामुळे धनादेश देणे आणि तो न वटल्यामुळे काय शिक्षा होते हे समोर आल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यामध्ये धनादेश देऊन बिनधास्त राहनाऱ्यांना एकप्रकारे हा इशारा मानला जात आहे.
धनादेश न वटल्याचे अनेक प्रकरणं प्रलंबित आहे. अनेक वर्षे उलटून गेले असून त्या प्रकरणांचा काय निकाल येऊ शकतो याचा अंदाज लावला जात असून धनादेश न वटण्याचे प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.