एका महिन्यात 21 बालके दगावली, ‘त्या’ वादग्रस्त हॉस्पिटलमध्ये पुन्हा ‘मृत्यूचे तांडव’
गेल्या वर्षी याच रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाला होता. यातील काही रुग्णांना किडनी स्टोन, अल्सर, न्यूमोनिया, सेप्टिसिमिया असे आजार होते. यातील काही मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता.
महाराष्ट्रातील ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती रुग्णालयात गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलांपैकी 15 बालकांचा जन्म याच रुग्णालयात झाला. तर, 6 बालकांना रेफर करून येथे पोहोचवण्यात आले. नवजात बालकांच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. हे तेच वादग्रस्त हॉस्पिटल आहे जिथे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये 10 महिला आणि 8 पुरुष होते. नवजात अर्भकांच्या मृत्यूबाबत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. जयेश पानोत यांनी सांगितले की, मृत अर्भकांपैकी 15 बालकांचा जन्म रुग्णालयात झाला. तर, 6 बालकांना इतर रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते. मुलांचे कमी वजन आणि मुदतपूर्व प्रसूती अशी बालमृत्यूची कारणे आहेत असे ते म्हणाले.
गेल्या वर्षीच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे होती.
गेल्या वर्षी याच रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाला होता. यातील काही रुग्णांना किडनी स्टोन, अल्सर, न्यूमोनिया, सेप्टिसिमिया असे आजार होते. यातील काही मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. तर, काही कुटुंबीयांनी रुग्णालयावर जास्त भार पडत असल्याचा आरोप केला होता. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने निष्काळजीपणाचा आरोप फेटाळून लावला होता. त्यानंतर सरकारने रूग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालयाच्या डीनकडून अहवाल मागवला होता.
9 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
दरम्यान, ठाण्यातच एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भिवंडीतील शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर येथील अभय यादव (42) याने गुरुवारी एका मुलीचे अपहरण केले. त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. नंतर तिचा गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावर टाकून त्याने तिथून पळ काढला.
काही नागरिकांनी त्या मुलीचा मृतदेह पहिला त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस तपासामध्ये यादव याचे नाव पुढे आले आणि काही तासातच पोलिसांनी यादवच्या मुसक्या आवळल्या. यादव याच्या या कृत्यामागे त्याचे मुलीच्या घरच्यांशी काही वैमनस्य आहे की आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.