मुंबई गोवा महामार्गावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर उलटला, मग…
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. अपघात झालेला कंटेनर बाजूला केला. त्याचबरोबर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.
पनवेल : कंटेनर (container) थेट रस्त्यात पलटी झाल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे रस्त्यात मोठी वाहतुक कोंडी झाली असून प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा. कंटेनरचा चालक जखमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) पळस्पे येथे अती वेगाने आलेल्या एका कंटेनर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावर उलटला आहे. चालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital)दाखल करण्यात आले आहे. वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,पलटी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. या कंटेनरमध्ये माल असल्याने आतील मालाचेही नुकसान झाले आहे.
नेमक काय झालंय
पनवेल परिसरात अधिक अपघात झाले आहेत. त्याबरोबर तिथून बाहेर जाणारे अनेक कंटेनर असतात. हा अपघात किती वाजता झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु अपघात झाल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा त्रास इतर गाड्यांना झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे येथे भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर कंटेनर पलटी झाला. त्यावेळी आजूबाजूला वाहन नसल्यामुळे कसल्याही प्रकारची जीवीतहाणी झालेली नाही. कंटेनरमधील चालक जखमी झाला आहे, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झालेला कंटेनर बाजूला केला. त्याचबरोबर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.