समीर वानखेडेंच्या याचिकेत मोठा खुलासा, वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेकदा संभाषण

समीर वानखेडे यांनी स्वतः याचिकेत मोठा खुलासा केला आहे. आर्यन खान प्रकरण सुरु असताना बॉलिवूड अभिनेता आणि आर्यनचा पिता शाहरुख खान याने वानखेडेंना केलेले व्हॉट्स अप मॅसेजबाबत वानखेडे यांनी याचिकेत खुलासा केला आहे.

समीर वानखेडेंच्या याचिकेत मोठा खुलासा, वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेकदा संभाषण
समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील संवाद समोर
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 5:07 PM

मुंबई : समीर वानखेडे यांच्या याचिकेत मोठा खुलासा करण्यात आला आहे. आर्यन खान प्रकरणावरुन शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात अनेकदा संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानने समीर वानखेडे यांना मेसेज केले होते. शाहरुख खानने मुलासाठी बाप म्हणून वानखेडे यांच्याकडे विनंती करतानाचे मेसेज समोर आले आहेत. संभाषणाचे स्क्रिनशॉट समोर आले आहेत. समीर वानखेडे यांनी याचिकेत या संभाषणाचा खुलासा केला आहे. या संभाषणाची प्रत वानखेडे यांनी याचिकेला जोडली आहे. या सर्व संभाषणात शाहरुखने आणखी एक मेसेज वानखेडे यांना केलाय तो म्हणजे मला स्वतः येऊन तुम्हाला मिठी मारायची इच्छा आहे. तुम्ही वेळ सांगा त्यावेळी मी भेटायलाही येऊ शकेल, असेही शाहरुखने मॅसेजमध्ये म्हटले आहे.

काय म्हटलंय संभाषणात?

माझा मुलगा या घटनेतून खूप काही शिकेल, त्याच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट ठरेल, असाही मेसेज शाहरुख खानने वानखेडे यांना केला होता. माझ्या मुलाला लवकरात लवकर घरी येऊद्यात. मी बाप म्हणून ही विनंती करतोय. या देशासाठी आपण खूप काही केलं. तरुण आणि प्रामाणिक तरुणांची देशाला गरज आहे. तुम्ही आणि मी माझ्या परीने केले. पुढच्या पिढीनेही ते करायला हवं. हे आपल्या हातात आहे की त्यांच्याकडून ते कसं करून घ्यायचं.

या सगळ्या घटनेत मी काहीही बोललो नाही. मी कुठलही स्टेटमेंट केलं नाही. ना मी माध्यमात कुठे व्यक्त झालो. माझा फक्त तुमच्यातल्या चांगल्या व्यक्तिमत्वावर विश्वास आहे. मला बाप म्हणून मोडायला लावू नका एवढीच मी विनंती करेन.

हे सुद्धा वाचा

माझ्या मुलाच्या बाबतीत थोडी संवेदना दाखवा, मी बाप म्हणून एवढीच विनंती करू शकतो. आम्ही सहज साधी राहणारी माणसं आहोत. माझा मुलगा थोडासा चुकला असेल, पण सराईत गुन्हेगारासारखं त्याला तुरुंगात टाकणं योग्य होणार नाही. त्याला तुरुंगात जास्त वेळ राहू देऊ नका. हॉलिडे सुरू झाल्यानंतर तो तिथेच अडकेल, ज्यात काहीही करता येणार नाही. काही खराब माणसांमुळे त्याचं आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या, असेही शाहरुख पुढे म्हणाला.

वानखेडे यांचे प्रत्युत्तर

आर्यनला तुरुंगात टाकून कोणालाही आनंद होत नाहीये, पण कायद्यात काही गोष्टींची तरतूद आहे. त्याच मी पालन करतोय. मी माझं कर्तव्य बजावत आहे. पण आर्यनच्या बाबतीत काहीही चुकीचं होणार नाही याची मी हमी देतोय, असे प्रत्युत्तर समीर वानखेडे यांनी शाहरुखला मॅसेजमधून केले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.