क्योंझर : काळी जादू केल्याच्या संशयातून एका दाम्पत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना ओडिसातील क्योंझर गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. बहदा मुर्मू आणि धानी मु्र्मू अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. रात्री अचानक आई-वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगी सिंगो ही बाहेर धावत आली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
मयत जोडपे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री आपल्या घरी झोपले होते. तर त्यांची मुलगी सिंगो आत रुममध्ये झोपली होती. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली. आई-वडिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगी रुमबाहेर धाव आली.
मुलीने पाहिले तर आई-वडिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तिने तात्काळ आपल्या काकाला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. यानंतर सिंगोचा काका आपल्या मुलासह मोटारसायकलवरुन घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी काकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मयत दाम्पत्य काळी जादू करत असल्याच्या संशयातून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.