Delhi Crime: दिवसाढवळ्या चोरट्याचा पोलिसावर चाकू हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृत्यू, मग…
आगोदर पोलिसाची भररस्त्यात हत्या, नंतर दुसऱ्याच्या मानेवर चाकू..., धक्कादायक घटनेमुळे परिसरात घबराहट
दिल्ली : दिल्लीत (Delhi Crime) एक भयानक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल चोरी करताना सापडलेल्या व्यक्तीला रस्त्यातून घेऊन जात असताना चाकू हल्ला (Knife attack) झाला आहे. चोरट्याने खिशात ठेवलेल्या धारधार चाकूने पोलिसावर रस्त्यात लोकांच्यासमोर हल्ला केला. त्यामध्ये पोलिस संबंधित पोलिसाचा (Delhi police) मृत्यू झाला आहे. त्यानंतर चोरटा तिथल्या एका फॅक्टरीत घुसला आणि तिथंही गोंधळ घातला असल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे.
दिल्लीतील ही घटना एका चित्रपटातील कथे सारखी आहे. या घटनेत पोलिसाचा मृत्यू झाला आहे. मायापुरी फेज-1 मध्ये चोरट्याला मोबाईल चोरताना लोकांनी पकडलं. त्याचबरोबर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतलं.
परंतु आरोपीला रस्त्यातून चालत पोलिस स्टेशनकडे निघालेल्या शंभु दयाल मीणा यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. आरोपी आणि पोलिस शंभु दयाल मीणा यांच्यात जोरात झटपट झाली. त्यावेळी शेजारी असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिस रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चोरट्याने तिथून एका मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य झालं नाही.
काहीवेळाने चोरटा अनीस समोर दिसत असलेल्या फॅक्टरीत घुसला. तिथल्या एका कर्मचाऱ्याच्या मानेवर सुरा ठेवला आणि बजावासाठी पोलिसांना विनंती केली. पण पोलिसांनी त्याला चलाखीने ताब्यात घेतले.