असे काय घडले की पित्याने पोटच्या गोळ्यालाच संपवले, वाचा नेमके प्रकरण काय?
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पित्याला अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा करत मुलाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
नरसिंहपूर : देशात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दररोज क्षुल्लक कारणातून हत्येसारख्या भयंकर घटना घडत आहेत. मध्य प्रदेशीतील नरसिंहपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणातून एका पित्याने आपल्या 18 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या हत्येचे कारण ऐकाल तर हैराण व्हाल. याप्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
काय घडले नेमके?
नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगाव परिसरात राहणारा केदार पटेल भाऊबीजेच्या रात्री आपल्या घरी जेवत होता. यावेळी त्याच्यासमोर एक मांजर आले. त्याने आपला मुलगा अभिषेकला मांजराला हकलून देण्यास सांगितले. मात्र मुलाने वडिलांच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला.
मुलाने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या पित्याने आधी मांजराला संपवले. त्यानंतर त्याच हत्याराने त्याने मुलाचा गळा चिरला. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पित्याला अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा करत मुलाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
एका मांजरामुळे घडलेले हत्याकांड पाहून नागरिकच नाही पोलीसही हैराण झाले. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. अति रागामुळेच वडिलांकडून मुलाची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोंदियात मुलाकडून बापाची हत्या
भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या घरगुती भांडणातून गोंदियात मुलाने पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मोतिराम टांगसू कुंभरे असे मयत पित्याचे नाव आहे.