मुलाने केलेल्या गुन्ह्याची सजा बापाला मिळाली, केवळ अपमानाने त्याने केले धक्कादायक कृत्य

पोलीसांना 5 मार्च रोजी एक कॉल आला की नरेला पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षाचालक जखमी अवस्थेत पडला आहे.

मुलाने केलेल्या गुन्ह्याची सजा बापाला मिळाली, केवळ अपमानाने त्याने केले धक्कादायक कृत्य
RIKSHWAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:00 AM

नवी दिल्ली : रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने माणसाला अनेक मोठ्या संकटात पडावे लागतं. केवळ आपला अपमान झाला याची सल मनात राहिल्यामुळे एकाने मुलाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा बापाला देऊन त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कोणताही धागा सापडत नसताना पोलिसांनी आरोपीला केवळ सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने जेरबंद केले. या प्रकरणातील आरोपीने आपण केवळ अपमानाचा बदला घेतल्याचे म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांना 5 मार्च रोजी एक कॉल आला की नरेला पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षाचालक जखमी अवस्थेत पडला आहे. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचली. जखमी व्यक्तीच्या डोक्यास पाठी मागे मोठी जखम झाली होती. आणि त्यातून खूपच रक्तस्राव होत होता. पोलिसांनी त्या जखमी रिक्षाचालकाला एसआरएचसी रूग्णालयात दाखले केले. त्यानंतर भरपूर रक्तस्राव झाल्याने या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केस दाखल केली

मृताची ओळख अखेर पटली त्याचे नाव सोहनलाल ( वय 54 ) असल्याचे समजले. आरोपी नरेलाचाच रहिवासी असल्याचे कळल्यानंतर हत्येचा उद्देश्य आणि आरोपीचा काही केल्या छडा लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही तपासण्याचा निर्णय घेतला.

सीसीटीव्हीत आरोपीचा चेहरा दिसला

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी एका सीसीटीव्ही आरोपी दिसल्याने पोलिसांना हायसे वाटले. त्यानंतर पोलीसांनी एक धागा मिळाल्याने तपासाला दिशा मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आपले खबरी कामाला लावले. त्यानंतर पोलिसांनी यश मिळाले, सोनीपत येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय मोनूला ताब्यात घेतले.

असा पकडला आरोपी

आता पोलिसांना आता गुन्हा कसा आणि का घडला आणी आरोपीने गुन्ह्याचे हत्यार कुठे लपवून ठेवले आहे. याचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी स्वतंत्र टीमची त्यासाठी स्थापना केली. अनेक जागांवर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यामुळे गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहिती नूसार आरोपी मोनू अलगद पकडला गेला.

या कारणाने नाराज झाला होता

आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने सुरूवातीला काही सांगितले नाही, परंतू पोलिसांनी आपला खाक्या दाखवतात आरोपी घडाघडा बोलू लागला. आरोपीने नाहरी गावातील रहिवासी पवन याच्याकडून व्याजावर चाळीस हजार रूपये घेतले होते. ते परत करण्यास त्याला अपयश आले होते. त्यामुळे पवन याने मयत सोहनलाल याचा मुलगा राजा याच्या मदतीने आरोपी मोनू याला पैसे कधी देणार याचा जाब विचारत कुंडली परिसरात मारहाण केली होती. त्यामुळे अपमानित झालेल्या आरोपी मोनूने याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.

डोक्यात विट टाकून मारले

रिक्षाचालक मोनू याने आपल्या रिक्षात आधीच विट ठेवली होती. रिक्षा दुरूस्त करण्यासाठी जायचे असल्याचा बहाणा बनवित आरोपीने सोहनलाल याला गोडी गुलाबीने बोलावून एकत्र ते रिक्षाने गेले, वाटेत बोलता बोलता सोहनलालच्या डोक्यात रिक्षात लपवलेली विट हाणून तीन ते चार वेळा हाणून मोनू पळून गेला. पोलिसांनी मृत सोहनलालचा मोबाईल आणि विट हस्तगत केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.