Kalyan : तरूणीवर आठ तरूणांचा वर्षभरापासून लैगिंक अत्याचार, आत्महत्या केल्यानंतर गुपीत उघडलं
एका तरूणाने संबंधीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करीत असतानाचा व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ इतरांना व्हायरल करेल.
कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) एका 18 वर्षीय मुलीवर मागील एक वर्षापासून आठ तरूण लैंगिक अत्याचार करीत होते. तसेच तरूणीला व्हिडीओ (Video) आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी सुध्दा देत असल्याचे उघडकीस आले आहे. काल तरूणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानंतर अनेक गोष्टी उकडकीस आल्या आहेत. अनेक दिवसांपासून संबंधित आरोपीकडून नाहक दिला जात होता. कंठाळलेल्या तरूणीने काल आपलं आयुष्य संपवलं आहे. कल्याणच्या पोलिसांनी (Police) संबंधित तरूणांना ताब्यात घेतलं आहे. स्वत:च्या मैत्रीनीने देखील आरोपीना मदत केली असल्याचं पोलिस तपासात उघडकीस आलं आहे.
मोबाईल पोलिसांच्या हाती लागल्याने प्रकरण उघडकीस आले
एका तरूणाने संबंधीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करीत असतानाचा व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ इतरांना व्हायरल करेल. अशी भीती दाखवून तरूणाने तरूणीला इतर मित्रांसोबत शाररिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मागील एक वर्षापासून असा प्रकार सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात आठ जणांना घेतले आहे. त्यापैकी एका आरोपीचा वडील बांधकाम व्यवसायिक असल्याचं समजतंय. मुलाला बाहेर काढण्यासाठी त्याने मुलीच्या कुटुंबियांवर दबाव आणला होता. मुलीचा मोबाईल सापल्यानंतर हे सगळं प्रकरण उजेडात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मृत मुलीच्या मैत्रीणीचा देखील हात आहे
विशेष म्हणजे यामध्ये मृत मुलीच्या मैत्रीणीचा देखील हात आहे. कारण आत्तापर्यंत मैत्रीणीने आठ जणांना मदत केली आहे. सनी पांडे, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल, अशी आरोपींची नावे आहेत. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं गैरकृत्य करताना व्हिडीओ काढायचा. तसेच तो इतरांना शेअर करायचा आणि त्यांनाही अत्याचार करायला लावायचा. देशात आत्तापर्यंत अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.