Chandrapur Crime : युवतीचा डोके छाटलेला मृतदेह आढळला, चंद्रपूरमध्ये खळबळ
भद्रावतीच्या ITI मागील भागात एका तरुणीचा डोके छाटलेला मृतदेह आढळल्याची माहिती भद्रावती पोलिसांनी मिळाली. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी युवतीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात एका युवती (Young Girl)चा नग्नावस्थेत डोके छाटलेला मृतदेह (Deadbody) सापडल्याने खळबळ उडाली आहे. भद्रावतीच्या ITI मागील भागात ही घटना उजेडात आली. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. या युवतीचे डोके निर्दयीपणे उडविण्यात आले आहे. युवतीचे डोके शोधण्याचा पोलिस आणि फॉरेन्सिक टीम प्रयत्न करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले. युवतीची ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. (The headless body of a young woman was found in Chandrapur)
तरुणीची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान
भद्रावतीच्या ITI मागील भागात एका तरुणीचा डोके छाटलेला मृतदेह आढळल्याची माहिती भद्रावती पोलिसांनी मिळाली. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी युवतीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकांनीही घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. घटनेच्या तपासासाठी पोलिस पुरावे शोधत आहेत. दरम्यान, मयत तरुणीची ओळख पटवणे आणि आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
नवी मुंबईत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला
एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन तरुणीवर तरुणाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील रबाळे येथे घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या जबाबावरुन रबाळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (The headless body of a young woman was found in Chandrapur)
इतर बातम्या
Lalu Prasad Yadav : लालूंच्या अडचणीत पुन्हा मोठी भर; जामीनावर सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी
Solapur Accident : पंढरपुरातून पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतानाना काळाचा घाला! दोघे भाऊ मृत्युमुखी