हिंदू मुलीचे मुस्लिम तरूणाशी लग्न लावून दिल्याने नाशिकमध्ये राडा, खाजगी विवाह संस्थेत काय घडलं ?
खाजगी विवाह संस्था हिंदू मुस्लिम विवाहाला खतपाणी घालत असल्याचा आरोप होऊ लागला असून त्यामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटना यांनी केला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये एका खाजगी विवाह संस्थेने एका हिंदू मुलीचे मुस्लिम मुलाबरोबर लग्न लावून दिल्याने रामकुंड परिसरात मोठा राडा झाला आहे. ही बाब हिंदुत्ववादी संघटनेला कळल्यानंतर त्यांनी संस्था चालकाच्या तोंडाला काळे फासत बेदम मारहाण केली आहे. पूजाऱ्याच्या तक्रारीवरुन नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाह संस्था चालक उमेश पुजारी यांनी पंचवटी पोलिसांत याबाबत तक्रार दिली ओटी. पंचवटी परिसरात असलेल्या काळाराम मंदिराच्या जवळ वैदिक पद्धतीने विवाह संस्था असून मागील आठवड्यात त्यांनी हिंदू मुलीचे मुस्लिम मुलाबरोबर लावून दिले होते. त्यांना विवाहानंतर प्रमाणपत्र देखील दिले होते. सोशल मीडियावर हे प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने हा राडा झाला आहे. यानंतर ही बाब नाशिकमधील हिंदुत्ववादी संघटना आणि तरुणीच्या नातेवाईकांना संस्थेत येऊन राडा केला आहे.
हिंदुत्ववादी संघटना आणि तरुणीच्या नातेवाईकांना संस्थेत येऊन राडा करत उमेश पुजारी यांच्या तोंडाला काळे फासत मारहाण केली आहे.
खाजगी विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह करून देणे आणि प्रमाणपत्र देणे असं काम करतो असं सांगताच उमेश पुजारी यांना मारहाण करण्यात आली आणि नंतर तोंडाला काळे फासण्यात आले.
या घटणेने नाशिकच्या पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली होती, पोलीस घटनास्थळी पोहचण्याआधीच तिथे पुरोहित संघाचे काही पुरोहित पोहचले होते, त्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.
मात्र, त्यानंतरही उमेश पुजारी यांना जमावाने धमकी दिली होती, त्यानुसार उमेश पुजारी यांनी पोलिसांत धाव घेत हा सर्व प्रकार सांगितला त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
खाजगी विवाह संस्था हिंदू मुस्लिम विवाहाला खतपाणी घालत असल्याचा आरोप होऊ लागला असून त्यामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटना यांनी केला आहे.
तर दुसरीकडे विवाह संस्थांच्या मदतीने अनेक तरुण तरुणी विवाह करून नातेवाईकांच्या विरोधात तक्रार करत असतात, या घटनेत असाच प्रकार घडल्याची माहिती पंचवटी पोलीसांनी दिली आहे.