Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताटात रस्सा सांडल्याचा वाद, कटर घेतलं आणि थेट रक्तच सांडलं! कोल्हापुरातील खळबळजनक हत्याकांड

आज उपचारादरम्यान जखमी ओंकार माने याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरवाड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ताटात रस्सा सांडल्याचा वाद, कटर घेतलं आणि थेट रक्तच सांडलं! कोल्हापुरातील खळबळजनक हत्याकांड
भांडणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:21 PM

कोल्हापूर : जेवताना झालेल्या भांडणातून दोघांवर कटरने (Cutter) हल्ला झाल्याची घटना कुरुंदवाड जवळ घडली होती. ही घटना येथील समाधान हॉटेलमध्ये घडली होती. त्यावेळी सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात (Sangli, Miraj Government Hospital) जखमींवर उपचार सुरू होते. तर अमीनमहम्मद रफिक पटेल (वय 21), ओंकार माने असे जखमी झाले होते. तर कुरुंदवाड पोलीसांत तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता. मात्र आज सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात उपचार (treatment) सुरू असताना ओंकार माने याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरवाड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

302 नुसार गुन्हा दाखल

दरम्यान संशयित आरोपी कुरुंदवाड इथले ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार तर शेडशाळ येथील कुलदीप संतपाल या तिघांवर आता कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कुरंदवाड पोलिसांनी सांगितले आहे.

ताटाला धक्का लागला आणि रस्सा ताटात सांडला

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील समाधान हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री औरवाड इथले अमीनमहंमद रफिक पटेल, ओंकार माने गेले होते. त्यावेळी तेथे संशयित आरोपी ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (दोघे रा. कुरुंदवाड) तर कुलदीप संतपाल (शेडशाळ) हे जेवायला बसले होते. यावेळी ओंकार शिकलगार याच्या ताटाला ओंकार माने कडून धक्का लागला आणि रस्सा ताटात सांडला. त्यावेळी माने याला ओंकार शिकलगार याने धक्का का मारलास असे विचारत धक्काबुकी केली. त्यावेळी पटेल, माने आणि ओंकार शिकलगार यांच्यात वाद सुरू झाला.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान जखमी ओंकार माने याचा मृत्यू

यादरम्यान शिकलगार याने खिशातील कटर काढत दोघांना जिवंत सोडणार नाही असे म्हणत, कटर अमीनंमहंमद पटेल, ओंकार माने यांच्या पोटावर वार करून जखमी केले होते. तर आरोपी प्रकाश शिकलगार याने पाण्याच्या स्टीलच्या जगणं मारहाण केली. तसेच वाईट शिवीगाळ देखील केली. तर संशयित आरोपी कुलदीप संतपाल याने शिवीगाळ करत लाथबुक्याने मारहाण केली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. याबाबत स्वतः जखमी अमीनमहंमद पटेल यांनी मिरज दवाखान्यात वर्दी जबाब दिल्यावरून कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज उपचारादरम्यान जखमी ओंकार माने याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरवाड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.